Jio नं लॉन्च केलं Jio POS Lite ऍप, तुम्ही देखील होऊ शकता ‘पार्टनर’ आणि करू शकता ‘कमाई’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Reliance Jio ने आपल्या युजर्सला लॉकडाऊन दरम्यान रिचार्ज करण्यासाठी येणाऱ्या अडचणी पाहता Jio POS Lite कम्युनिटी रिचार्ज ऍप लाँच केले आहे. या ऍपचे वैशिष्ट्य असे की या ऍप द्वारे कोणीही Jio पार्टनर होऊ शकते आणि रिचार्ज करून कमिशन कमावू शकते. हे ऍप सध्या Google Play Store वर उपलब्ध आहे. या ऍपला तेथून डाऊनलोड करून Jio पार्टनर होऊ शकता. Jio पार्टनर होण्यासाठी पहिले तुम्हाला रजिस्टर करावे लागेल. यासाठी कोणत्याही प्रकारच्या फिजिकल व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही आणि कोणत्याही डॉक्युमेंटच्या हार्ड कॉपीची देखील आवश्यकता नाही.

Jio पार्टनर झाल्यानंतर कोणत्याही युजरच्या Jio नंबरला Jio POS Lite कम्युनिटी ऍप द्वारे रिचार्ज करू शकता. प्रत्येक नंबरला रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला कमिशन म्हणून निश्चित रक्कम मिळेल. युजर हवे तर आपल्या नंबरला जिओच्या अधिकृत वेबसाइट आणि My Jio ऍप वरूनही करू शकतात, पण हे ऍप त्या युजर्ससाठी जास्त फायदेशीर आहे, जे ऑनलाइन बँकिंग किंवा कोणत्याही डिजिटल वॉलेटचा वापर करत नाही.

Jio POS Lite ऍप द्वारे कंपनी पार्टनरला ४.१६ टक्के कमिशन ऑफर करत आहे. प्रत्येक रिचार्ज अमाऊंटवर पार्टनरला ही कमिशन ऑफर मिळणार आहे. पार्टनर या ऍपमधून कमावलेल्या आणि वॉलेट बॅलन्सला चेक करू शकतो. यात पार्टनरला मागच्या २० दिवसांचे ट्रँजॅक्शन देखील दिसेल. जसे तुम्ही पार्टनर होण्यासाठी या ऍपमध्ये रजिस्टर कराल, तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यास सांगितले जातील. यात ५०० रुपयेपासून २००० रुपये पर्यंतची रक्कम लोड करू शकता. या ऍप द्वारे प्रत्येक १०० रु. उपभोगानंतर पार्टनरला ४.१६ रु. लाभ मिळतो.