Apurva Nemlekar | ‘त्या’ प्रश्नावर चाहत्याला अपूर्वा नेमळेकरचे सडेतोड उत्तर; नक्की काय म्हणाली अपूर्वा नेमळेकर…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ‘रात्री स खेळ चाले’ (Ratris Khel Chale) मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले होते. शेवंता या पात्रामुळे ती नेहमी चर्चेत होती. सध्या ती बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) मध्ये देखील दाखल झाल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिग बॉसमध्ये सर्वाधिक चर्चेतील अभिनेत्री म्हणून अपूर्वाची (Apurva Nemlekar) ओळख आहे. एवढेच नाही तर चाहत्यांना तिच्या खाजगी आयुष्यात नक्की काय चालू आहे हे जाऊन घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. याचाच एक स्क्रिन शॉट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

बिग बॉस मराठी मध्ये येण्याआधीच अपूर्वाने तिच्या इंस्टाग्राम वर ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी अनेक चाहत्यांनी तिला खूप सारे प्रश्न विचारले होते. तर यातलाच एक प्रश्न एका चाहत्याने विचारले होते कि, “तू सिंगल आहेस की, तुझं लग्न झालंय?” अशा या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला अपूर्वाने (Apurva Nemlekar) फारच स्पष्ट शब्दात उत्तर दिले होते. तिने यावर म्हटले की “मी सध्या तरी सिंगल आहे त्यात मी आनंदी आहे पण तरीही मी माझ्या प्रिय व्यक्तीची वाट बघते सध्या तिच्या या उत्तरचे स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. अपूर्वा बिग बॉस मराठी मध्ये दाखल झाल्यानंतर हा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अपूर्वा नेमळेकरने ‘आभास’ (Aabhas) या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली होती.
त्याचबरोबर तिने ‘ती एकापेक्षा एक जोडीचा मामला’ (Ti Eka Peksha Ek Jodicha Mamla) यामध्ये झळकली होती.
मात्र तिला चांगली प्रसिद्धी ही ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून मिळाली होती.
या मालिकेच्या दोन्ही भागात तिने उत्तम काम केले होते. ‘आराधना’ (Aradhana) या मालिकेतही अपूर्वाचे काम कौतुकास्पद होते.
त्याचबरोबर ‘तू माझा सांगती’ (Tu Maza Sangati) या मालिकेतही तिने उत्तम भूमिका साकारली होती.

 

Web Title :- Apurva Nemlekar | marathi actress apurva nemlekar comment on relationship questions said yes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | “ज्यांनी वडिलांचं ऐकलं नाही ते…”; भाजप नेते राम कदमांचा उद्धव ठाकरे आणि घराणेशाहीवर निशाणा

Sania and Shoaib Divorce | शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाची चर्चा पण दोघांनी केली ‘ही’ घोषणा

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, म्हणाले – ‘…तर बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होईल’