Uddhav Thackeray | “ज्यांनी वडिलांचं ऐकलं नाही ते…”; भाजप नेते राम कदमांचा उद्धव ठाकरे आणि घराणेशाहीवर निशाणा

पोलिसनामा ऑनलाईन – उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बाळासाहेबांचं ऐकलं नाही, तर ते जनतेचं काय ऐकणार, भाजपचे नेते राम कदम (BJP leader Ram Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) चौफेर टीका होत आहे. यात आता राम कदमांची भर पडली आहे.

 

“बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणाले होते, ज्यावेळेस मला काँग्रेससोबत जायची वेळ येईल तेव्हा मी माझा पक्ष बंद करेल पण काँग्रेस बरोबर जाणार नाही. हे उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही का? जी व्यक्ती स्वत:च्या स्वर्गीय संस्थापक अध्यक्षांचं ऐकत नाही, स्वत:च्या वडिलांचं ऐकत नाही, ती व्यक्ती मुंबईच्या गोरगरिबांचं काय ऐकणार आहे?,” अशी टीका राम कदमांनी केली आहे.

तसेच त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेल्या घराणेशाहीवर टीका केली,“राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यानंतर काँग्रेसचा सर्वेसर्वा कोण? तर राहुल गांधींचाच कोण तरी. आदित्य ठाकरे (Aditya Thakceray) यांच्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कंपनीचा सर्वेसर्वा कोण? आदित्य ठाकरेंचं पोरगं. बाकीच्यांनी टीळा लावायचा, हाती झेंडा घ्यायचा आणि उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणायचं बाकी काही नाही.”

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | bjp leader ram kadam criticize shivsena
uddhav thackeray said he did not listen balasaheb thackeray mahavikas aghadi rahul gandhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा