APY | मिळेल 5000 रूपये पेन्शन, जर 40 व्या वर्षी असे कराल प्लॅनिंग, जाणून घ्या सरकारी स्कीमच्या डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – APY | तुमचे वय 40 आहे आणि दरमहिना 5000 रूपये पेन्शन मिळवण्याची इच्छा आहे का, जर होय तर तुम्हाला गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधावा लागेल. जो तुम्हाला इतक्या रक्कमेच्या पेन्शनची गॅरंटी देईल. अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) म्हणजे एपीवाय अशीच एक योजना आहे. या योजनेद्वारे तुम्ही प्रति महिना 5000 रूपये पेन्शन मिळवू शकता. (APY)

 

काय आहे अटल पेन्शन योजना
केंद्रीय अर्थसंकल्प 2015-16 मध्ये घोषित एपीवाय केंद्र सरकारची एक योजना आहे, जी वृद्धपकाळात उत्पन्नाची हमी देते आणि अंसघटित क्षेत्रातील सर्व नागरिकांवर केंद्रीत आहे. सरकार याद्वारे लोकांना आपल्या सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहन देते.

 

या योजनेचे व्यवस्थापन नॅशनल पेन्शन सिस्टमद्वारे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे केले जाते.

 

ही एक गॅरंटेड पेन्शन योजना आहे. यामध्ये एक व्यक्ती अकाऊंट उघडून दरमहिना 1000 रूपयांपासून 5000 रूपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकते. केंद्र सरकार सबस्क्रायबरच्या योगदानात 50 टक्के किंवा 1000 रूपये, जे कमी असेल तेवढे योगदान करते. सरकारचे सह-योगदान अशा लोकांसाठी आहे जे सामाजिक सुरक्षा योजनांच्या कक्षेत येत नाहीत आणि इन्कम टॅक्स पेयर नाहीत. (APY)

 

कशी मिळेल 5000 पेन्शन
जर तुम्ही कमी वयात या योजनेत सहभागी झालात तर 60 व्या वर्षानंतर 5000 रूपये महिना पेन्शन मिळू लागेल. यास असे समजू शकता की, जर तुम्ही 18 वर्षाच्या वयात एपीवाय सबस्क्राईब केले तर दररोज अवघे सात रूपये म्हणजे 210 रूपये प्रति महिना बचत करून 60 वर्षाचे झाल्यानंतर 5000 पेन्शन मिळवू शकता.

 

तर 40 वर्षाच्या वयात एपीवायसाठी दर दिवस किमान 145.40 रूपयांची बचत करावी लागेल. 18 वर्षाच्या वयात योजनेत सहभागी झाल्यास 105840 रूपये, 210 रुपये महिना जमा करावे लागतील. तर 40 वर्षाच्या वयात सहभागी झाल्यास 348960 म्हणजे 1454 रूपये महिना जमा करावे लागतील.

अटल पेन्शन योजनेतून कसे बाहेर पडता येते

60 वर्षांचे वय पूर्ण झाल्यावर
60 वर्षाच्या वयात तुम्ही यातून निघालात तर 100 टक्के पेन्शन मिळवण्याचा अधिकार आहे. अशावेळी तुम्हाला पेन्शन मिळण्यास सुरूवात होईल.

 

काही कारणास्तव मृत्यू झाल्यास
सबस्क्रायबरचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला आणि दोघांच्या मृत्यूच्या स्थितीत पेन्शन कॉर्पस त्यांच्या नॉमिनीला मिळेल.

 

60 वर्षांच्या वयाच्या अगोदर
60 वर्षाच्या वयाच्या अगोदर या योजनेतून बाहेर पडण्यास परवानगी नाही.
मात्र, लाभार्थीचा मृत्यू किंवा असाध्य आजार होणे यासारख्या स्थितीत यासाठी मंजूरी आहे.

 

Web Title :- APY | atal pension yojana want to earn rs 5000 guaranteed monthly income what you should do at age 40

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Medical Education Trust | भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी शिक्षक व कर्मचारी भरती होणार

 

Ajit Pawar | ‘देहूमधील कार्यक्रमाबद्दल मला काहीच बोलायचे नाही’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

 

Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा ! चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि 500 रुपये मिळवा