Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा ! चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि 500 रुपये मिळवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari | दिल्लीतील इंडस्ट्रियल डीकार्बनायझेशन समिट (Industrial Decarbonization Summit 2022 -IDS-2022) या कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा आणि 500 रुपये मिळवा,’ अशी घोषणा गडकरी यांनी यावेळी केली.

 

नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, “आपल्या देशात अनेक शहरांमध्ये कार पार्किंग विषयी नागरिकांना शिस्त नसल्याचं वेळोवेळी दिसून येत आहे. मिळेल त्या ठिकाणी गाडी पार्क करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून आता अशा प्रवृत्तीविरोधात नवीन कायदा आणण्याचा विचार केंद्र सरकार (Central Government) करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 

“जो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर गाडी उभी करेल त्याला 1000 रुपये दंड लावण्यात येईल.
त्याचवेळी त्या गाडीचा फोटो काढून पाठवणाऱ्या व्यक्तीला 500 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.” असं नितीन गडकरी म्हणाले.
त्याचबरोबर ‘अनेक लोक आपल्या गाडीसाठी पार्किंगची सोय करत नाहीत, त्या ऐवजी गाडी रस्त्यावर उभी करतात,’ असं ते म्हणाले.

 

Web Title :- Nitin Gadkari | BJP leader and union minister nitin gadkari announced law to reward person sending pics of wrongly parked vehicle in offing

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा