APY | रू. 42 महिना जमा करून रू.1,000 महिना मिळवणार्‍यांची आहे मोठी रांग, जाणून घ्या योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – APY | पेन्शनमुळे (Pension) लोकांना मासिक उत्पन्न मिळते. सध्या सरकार अनेक पेन्शन योजना चालवत आहे. या योजनांपैकी अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana (APY) तरुण आणि महिलांना पसंत पडत आहे. संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey 2022) मध्ये असे दिसून आले आहे की सप्टेंबर 2021 पर्यंत या योजनेत सहभागी होणारे 43 टक्के लोक 18 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत. मार्च 2016 मध्ये अटल पेन्शन योजनेतील या वयोगटाचा वाटा 29 टक्के होता.

 

अटल पेन्शन योजना (APY) महिलांना आकर्षित करत आहे. मार्च 2016 मध्ये महिलांचा सहभाग 37 टक्के होता, तर सप्टेंबर 2021 पर्यंत तो 44 टक्के झाला आहे. आर्थिक सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की जास्तीत जास्त लोक मासिक 1,000 रुपये पेन्शन स्वीकारत आहेत.

 

मार्च 2016 मध्ये, 38 टक्के लोकांनी 1,000 रुपये मासिक पेन्शनचा पर्याय निवडला, तर सप्टेंबर 2021 मध्ये हा आकडा 78 टक्क्यांवर पोहोचला. 2,000, 3,000 आणि 4,000 रुपये मासिक पेन्शनचा पर्याय या योजनेत समाविष्ट असलेल्या एकूण लोकांपैकी 8 टक्के लोकांनी निवडला आहे. 14% लोकांनी 5,000 रुपये मासिक पेन्शनचा पर्याय पसंत केला आहे.

 

अशी आहे अटल पेन्शन योजना (What Is APY)

18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकते.

18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रुपये जमा केल्यास, वयाच्या 60 व्या वर्षी त्याला दरमहा 1,000 रुपये पेन्शन मिळेल.

वयाच्या 18 व्या वर्षी प्रत्येक महिन्याला 210 रुपये पेन्शन जमा केल्यावर, निवृत्तीनंतर 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळते.

वयानुसार प्रीमियमची रक्कम वाढते.

वयाच्या 40 व्या वर्षी जर एखाद्याला Atal Pension Yojana चा लाभ घ्यायचा असेल तर त्याला दरमहा 1 हजार रुपये पेन्शनसाठी 291 रुपये दरमहा जमा करावे लागतील. तर 5 हजार रुपये दरमहा पेन्शनसाठी 1,454 रुपये जमा करावे लागतील.

मिळतात अनेक फायदे (APY Benefits)
अटल पेन्शन योजनेच्या प्रीमियमवर प्राप्तीकर कलम 80सीसीडी अंतर्गत कराचा लाभ उपलब्ध आहे. कलम 80सीसीडी अंतर्गत कपातीची कमाल मर्यादा रु 2 लाख आहे. यामध्ये 50,000 रुपयांच्या अतिरिक्त कपातीचाही समावेश आहे.

 

3 कोटी 90 लाख लोक झाले सहभागी
12 ऑक्टोबर 2021 पर्यंत 3 कोटी 90 लाख लोक अटल पेन्शन योजनेत सहभागी झाले होते.
या योजनेत या लोकांचे योगदान 16109 कोटी रुपये आहे. अटल पेन्शन योजना जवळपास प्रत्येक बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.

 

न्यू पेन्शन स्कीम आणि अटल पेन्शन योजनेच्या सदस्यांच्या संख्येत सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत 23.7% वाढ झाली आहे.
सप्टेंबर 2020 मध्ये, 37.4 दशलक्ष लोक सहभागी झाले होते, जे 2021 मध्ये वाढून 46.3 दशलक्ष झाले.
एनपीएस अंतर्गत एकूण योगदान देखील एका वर्षात 29 टक्क्यांनी वाढले आहे.

 

Web Title :- APY | youth participation increased in atal pension yojana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,252 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nashik Crime | धक्कादायक ! नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे यांची सुपारी देऊन हत्या झाल्याचं उघडकीस आल्यानं प्रचंड खळबळ

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी ! बोलेरो आणि पिकअप गाडीचा वापर करुन ATM मशीन चोरणारी टोळी गजाआड, 5 गुन्हे उघडकीस