Nashik Crime | धक्कादायक ! नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे यांची सुपारी देऊन हत्या झाल्याचं उघडकीस आल्यानं प्रचंड खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | महापालिकेच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (Dr. Suvarna Waje) यांच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ अखेर समोर (Nashik Crime) आलं आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) या प्रकरणाचा छडा लावला आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृत्यू कसा झाला? हा सवाल अनेक दिवस झाले अनुत्तरीत होता. अखेर याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे (Sandeep Waje) यांनी पत्नी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र अखेर 10 दिवसाच्या तपासानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. डॉ सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजेला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.

 

डॉ. सुवर्णा वाजे (Dr. Suvarna Waje) यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे नजीक जळालेल्या अवस्थेत आढळला होता. गाडीत आढळलेला मृतदेह आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए (DNA) एकच असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. म्हणून डॉ. सुवर्ण वाजे मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले होते. दरम्यान यापूर्वी डॉ. वाजे यांचे पती संदीप वाजे यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. (Nashik Crime)

नाशिक पोलिसांच्या तपासानुसार, आता डीएनए (DNA) तपासातून ती माहिती समोर आलीय.
डीएनए एकच असल्याने आता डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हाडाचा डीएनए अहवाल नाशिक ग्रामीण पोलिसांना (Nashik Rural Police) प्राप्त झाला होता.
त्यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांना शहराबाहेर नेऊन जाळण्यात आल्याचा अंदाज होता.
यानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे.

 

Web Title :- Nashik Crime | dr suvarna waje murder case news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी ! बोलेरो आणि पिकअप गाडीचा वापर करुन ATM मशीन चोरणारी टोळी गजाआड, 5 गुन्हे उघडकीस

 

Banking Rules Change | SBI, ICICI, PNB आणि Bank of Baroda यांनी नियमात केले मोठे बदल

 

Blood Sugar | मधुमेहात सर्वात जास्त प्रभावित होतात ‘हे’ अवयव, वेळेवर नाही केले नियंत्रण तर होऊ शकतात डॅमेज; जाणून घ्या सविस्तर