AR रहमानचा खुलासा, म्हणाला – ‘माझ्याविरोधात काम करतोय ग्रुप, नाही मिळत जास्त काम’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ऑस्कर विनिंग कंपोजर ए आर रहमान यानं खुलासा केला आहे की, एक गँग त्याच्याविरोधात काम करत आहे आणि अफवा परसवत आहे. हिंदी सिनेमात मला काम मिळत नाही अशा अफवा पसरवल्या जात आहेत असं एआर रहमाननं सांगितलं आहे. सुशांतचा दिल बेचारा या सिनेमासाठी एआर रहमान यानंच संगीत दिलं आहे.

एका मुलाखतीत ए आर रहमान याला विचारण्यात आलं की, तुम्ही तमिळ सिनेमांच्या तुलनेत हिंदी सिनेमात कमी काम का करता ? यावर उत्तर देताना ए आर रहमान म्हणाला, “मी चांगल्या सिनेमांना नकार देत नाही. परंतु कोणती तरी गँग आहे जी गैरसमजामुळं चुकीच्या बातम्या पसरवत आहे. मुकेश छाबडा माझ्याकडे आल्यानंतर मी 2 दिवसात त्यांना गाणं तयार करून दिलं.”

ए आर रहमाननं पुढं म्हणाला, “मुकेश छाबडा मला म्हणाले, सर किती लोकांनी मला सांगितलं तुमच्याकडे नका जाऊ म्हणून. त्यांनी अनेक स्टोऱ्याही ऐकवल्या. मी ते ऐकल्यावर विचार केला आणि म्हणालो, ठिक आहे. आता मला समजलं की, मला कमी काम का मिळत आहे आणि चांगले सिनेमे माझ्याकडे का येत नाहीयेत.”

‘नशिबावर माझा विश्वास’

रहमाननं सांगितलं की, “मी डार्क सिनेमे करतो. कारण एक ग्रुप माझ्या विरोधात काम करत आहे. त्यांना कळत नाहीये की ते माझं नुकसान करत आहेत. काही लोकांना वाटतं मला काम मिळू नये. ठिके आहे. मी नशिबावर विश्वसास ठेवतो आणि मला असं वाटतं की, तुमच्याकडे सारं काही देवाकडून येतं.”