‘इथं’ शिक्षकांना ‘अच्छे दिन’, मिळतो 1.75 लाख रुपये पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याकडे शिक्षकांना समाजात भरपूर आदर मिळतो मात्र पगाराबाबत पाहिल्यास अनेक शिक्षक तुटपुंज्या पगारावर काम करताना दिसतात. ४ दिवसांपूर्वी देखील नुकत्याच शिक्षक म्हणून निवड झालेल्या नवीन शिक्षकांना तब्बल ३ वर्षे केवळ ६ हजार प्रतिमहिना पगारावर काम करावे लागणार आहे. त्यानंतर नियोजित पगार चालू केला जाईल. बंगळूरमध्ये मात्र याहून वेगळी स्थिती असून येथील काही खासगी शाळांतील शिक्षकांना वार्षिक ७.५ ते १८ लाख इतके घसघशीत पॅकेज दिले जात आहे.

होय, बंगरूळूमधील शिक्षकांना आता अच्छे दिन आले असून येथिल शिक्षकांना भरघोस पगार दिला जातोय. येथील एका इंटरनॅशनल स्कूल मधील शिक्षकांना अविश्वसनीय वाटावा इतका जास्त पगार दिला जात आहे. येथील शिक्षकांना ९० हजार ते दीड लाख रुपये प्रती महिना म्हणजेच ७.५ लाख ते १८ लाख रुपये वार्षिक पॅकेज दिले जात आहे. तर इंटरनॅशनल स्कूलमधील मुख्याध्यापकांना वार्षिक दीड कोटी रुपये इतका पगार प्रतिमहिना पडत आहे. एवढेच नाही तर अन्य लक्झरियस सुविधाही शिक्षकांना पुरविल्या जात आहेत. यांमध्ये मोफत राहण्याची सुविधा, कुटुंबांना भेटायला जाण्यासाठी मोफत हवाई प्रवास यांचा समावेश आहे.

तुलनात्मकदृष्ट्या पाहता अन्य राज्यांमध्ये शिक्षकांना तुटपुंजे वेतन :
देशातील अन्य भागांमध्ये मात्र कोठेच शिक्षकांना इतका पगार असल्याचे दिसून आले नाही. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार, प्राथमिक शिक्षकांना जास्तीत जास्त ३५,३७० रुपये प्रति महिना मिळतो. तर खाजगी शाळांमध्ये मात्र जवळपास सर्वत्रच १५ हजार रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जातो. तर केंद्रीय विद्यालयातील शिक्षकांना ८० हजार रुपये प्रति महिना पगार मिळतो. बंगळूरमध्ये मात्र प्राथमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांना देखील मोठा पगार दिला जात असून प्रति महिना ६२ हजार ते १.७५ लाख पगार दिला जातोय. तर मुख्याध्यापकांना १.२५ लाख ते २.५ लाख रुपये प्रति महिना पगार दिला जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like