Arjun Kapoor Malaika Arora | अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दिसले पुन्हा एकत्र; पॅचअप झाल्याने चाहते खूश

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये मागील काही दिवसांपासून अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Arjun Kapoor Malaika Arora) यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. बी टाऊनमधील या लवली कपलचे ब्रेकअप झाले असल्याचे बोलले जात होते. मलायकाने अर्जुनच्या फॅमिली मेंबरला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यामुळे आणि ब्रेकअपची माहिती देणारा स्वेटशर्ट परिधान केल्यामुळे त्यांच्या ब्रेकअपवर (Arjun And Malaika Breakup) शिक्कमोर्तब होत होते. मात्र या लोकप्रिय जोडीने सगळ्या या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. अर्जुन व मलायका (Arjun Kapoor And Malaika Arora) हे काल (दि.27) संध्याकाळी डीनर डेटवर एकत्र गेलेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावर सर्वत्र त्यांची व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्रेकअपच्या चर्चेमुळे लाईमलाईट असलेले मलायका व अर्जुन हे डिनर डेटवर (Arjun And Malaika Dinner Date) गेलेले स्पॉट झाले. मुंबईतील (Mumbai) एका रेस्टॉरंटमध्ये ते जाताना पापाराझींनी त्यांना स्पॉट केले. यावेळी अर्जुन कपूर हा मलायकाची काळजी घेताना दिसून आला. डिनर डेटसाठी आलेल्या मलायकाने व्हाईट कलरचा डिझायनर टॉप आणि सोबत व्हाईट कलरची शॉर्ट स्टाईल केली होती. हातामध्ये छोटी बॅग आणि गॉगल परिधान केलेल्या मलायकाच्या लूकचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अर्जुन देखील कॅज्युअल लूकमध्ये दिसून आला. सोशल मीडियावर ही व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर कंमेंट्स चा वर्षाव केला आहे. अभिनेता अर्जुन आणि मलायकाच्या चाहत्यांनी त्यांना पुन्हा एकत्र पाहून आनंद व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओखाली एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “तुम्हा दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहून खूप आनंद होत आहे”. तर दुसऱ्या चाहत्याने कमेंट केले आहे की, “तुम्ही असेच एकत्र राहा, आम्हाला तुमची जोडी खूप आवडते.”

बॉलीवुडमध्ये लोकप्रिय असणारे अर्जुन व मलायका अरोरा (Arjun Kapoor And Malaika Arora) कपल नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या वयातील फरकामुळे या कपलला अनेकदा ट्रोल देखील केले जाते. मागील काही दिवसांपासून अर्जुन प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला (Kusha Kapila) हिला डेट करत असून त्याने मलायकसोबत ब्रेकअप केले असल्याचे बोलले जात होते. मलायका देखील ब्रेकअपचे अनेक संकेत देत होती. मात्र अर्जुन आणि मलायका डेटवर गेल्याचे पाहून या चर्चा आता थांबल्या आहे. त्यांच्या डेटिंगच्या व्हिडिओमुळे ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणी काळभोर: तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी; खंडणी मागणार्‍या गुंडाला अटक

ACB Trap On Policeman | समन्स बजाविण्यासाठी लाचेची मागणी, पोलिस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Chitra Wagh | ‘उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट’, चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र (व्हिडीओ)