‘पानीपत’मध्ये अभिनेता अर्जुन कपूरनं ‘मराठा’ दिसण्यासाठी ‘अशी’ केली तयारी ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर आपला आगामी सिनेमा पानीपतमुळे चर्चेत आहे. या सिनेमात अर्जुनचा लुक त्याच्या इतर सिनेमांपेक्षा खूपच वेगळा आहे. या लुकसाठी अर्जुननं स्वत:मध्ये खूप बदल केले. व्हिडीओ शेअर करत आपले हे अनुभव अर्जुननं सांगितले आहेत.

https://www.instagram.com/tv/B5fLSMIFXpA/?utm_source=ig_embed

अर्जुननं इंस्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिसत आहे की, पेशवा आणि मराठा सैनिक लुक करण्याचा अर्जुनचा अनुभव कसा होता. व्हिडीओत अर्जुन एका सलूनमध्ये दिसत आहे.

‘मला वाटत नव्हतं की, एका पेशवाप्रमाणे मी मराठा दिसू शकतो’
मराठा लुक पाहता अर्जुन म्हणाला, “मला वाटत नव्हतं की, एका पेशवाप्रमाणे मी मराठा दिसू शकतो. परंतु आशु सर(आशुतोष गोवारीकर) यांना हे माहिती होतं. ते खूपच बारकाईनं काम करणारे व्यक्ती आहेत. त्यांनी भूमिका आणि मला घेऊन रिसर्च केला होता. त्यांनी माझे सिनेमे आणि माझे फोटो पाहिले. ते माझ्या भूमिकेला घेऊन एकदम क्लीअर होते.”

https://www.instagram.com/p/B4bvqF2g9UH/

पानीपत या सिनेमताबद्दल बोलायचं झालं तर, अर्जुन कपूर, कृती सेनन, संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरे आणि जीनत अमान प्रमुख भूमिकेत आहेत. आशुतोष गोवारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 6 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती गाजतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/B4bh7jdAYYq/

Visit : policenama.com