Arjun Tendulkar | … अर्जुन तेंडुलकर मुंबईचा संघ सोडणार, जाणून घ्या कोणत्या नवीन संघात एन्ट्री करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएलमधील (IPL) सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मधील खेळाडू अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबईचा संघ सोडणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Master Blaster Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर मुंबईचा संघ सोडणार असल्याच्या वृत्तामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अर्जुन तेंडूलकरच्या (Arjun Tendulkar) या निर्णयानंतर तो यापुढे कोणत्या संघाकडून खेळणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

 

अर्जुन हा मुंबई इंडियन्सच्या संघाचा एक भाग आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने दोन वेळा त्याला लिलावात (Auction) आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. मात्र आतापर्यंत एकदाही त्याला खेळण्याची संधी दिली नाही. गेल्या हंगामात मुंबईच्या संघाने सलग आठ सामने हरले होते. या पराभवानंतर ते आयपीएलमधून बाद झाले. त्यामुळे मुंबईचा संघ त्याला संधी देईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र अर्जुन तेंडूलकरच्या (Arjun Tendulkar) मागून आलेल्या गोलंदाजांना मुंबईच्या संघाने संधी दिली. पण अर्जुनला एकही सामना खेळवला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ अर्जुनला खेळवणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. परंतु मुंबईच्या संघाने मोसम संपेपर्यंत एकदाही संधी दिली नाही.

या वर्षी त्याला एकही संधी न देता मुंबईच्या संघाने बाहेर केले होते. पण अर्जुनने मुंबई क्रिकेट संघटनेकडे ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) मागितले होते.
त्यामुळे अर्जुन आता मुंबईचा संघ सोडणार असल्याचे स्पष्ट झाले.
अर्जुनला मुंबई क्रिकेट संघटनेने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे अर्जुन दुसऱ्या संघाकडून खेळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

 

मुंबईचा संघ सोडल्यानंतर अर्जुन गोवा संघाकडून (Goa Team) खेळणार असल्याचे समोर आले आहे.
गोव्याच्या संघाला डावखुरा वेगवान गोलंदाजांची आवश्यकता आहे.
त्यामुळे अर्जुन गोवा संघाकडून खेळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
अर्जुनला जास्तीत जास्त सामने खेळायची संधी मिळावी, यासाठी त्याने मुंबईच्या संघाला सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
मात्र, सचिन मुंबईकडून खेळून मोठा झाला तरी अर्जुनने हाच संघ सोडल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे.
मात्र आता अर्जुन गोवा संघात कधी दाखल होणार याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

 

Web Title : – Arjun Tendulkar | arjun sachin tendulkar prepares to leave mumbai see which new team he will join now

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा