PoK ताब्यात घेण्यास लष्कर सदैव तयार, सरकानं निर्णय घ्यावा : बिपीन रावत (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानी लोकांना हा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, आता भारताचे लक्ष पाकव्याप्त काश्मीरवर (PoK) आहे. पाकव्याप्त काश्मीरविषयी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की सरकारने पाकव्याप्त काश्मीरबाबत निर्णय घ्यावा. सैन्य कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार आहे.

पाकव्याप्त काश्मीरची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका करण्याची गरज असून पाकव्याप्त काश्मीरशी संबंधित कोणत्याही मोहिमेसाठी भारतीय लष्कर तयार आहे. मात्र, यावर सरकारला निर्णय घ्यायचा आहे असे विधान लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले आहे. पाकव्याप्त काश्मीरबाबत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रावत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काश्मीरविषयी बोलताना बिपिन रावत म्हणले की , ‘पाकव्याप्त काश्मीरबाबत सरकारने केलेल्या वक्तव्याबाबत आपण खूश आहोत. काश्मीरचे लोक हे आपल्याच देशाचे लोक आहेत. ते आमचेच लोक आहेत. काश्मीरच्या लोकांनी ३० वर्षे दहशतवादाला तोंड दिले आहे. आता त्यांना शांतीसाठीही वेळ द्यायला हवी. काश्मीरच्या लोकांना शांततेचे वातावरण देण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांना संधी दिली गेली पाहिजे.’

काय म्हणाले होते मंत्री जितेंद्र सिंह
पाकिस्तानशी चर्चा आता फक्त पाकव्याप्त काश्मीरवर होईल. कलम 370 रद्द केल्यावर आमचा पुढील अजेंडा पाकव्याप्त काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवण्याचा आहे.