येरवडा मेंटल हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या आरोपींना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील येरवडा मेंटल हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या दोन आरोपींना खडकी पोलिसांनी आज (शनिवार) अटक केली. खडकी पोलिसांनी या दोन आरोपींना आज रात्री आठच्या सुमारास भोर येथून अटक केली. दोन दिवसांपूर्वी हे दोन आरोपी येरवडा मेंटल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करुन पळून गेले होते.

संतोष बाबर, उदय गोहाराम बंजारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही येरवडा जेलमध्ये खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होते. या दोघांना उपचारासाठी येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.

[amazon_link asins=’B06WV7CZ7H’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8913baf1-820c-11e8-b883-e922f90c7f97′]

आरोपींनी हॉस्पिटलचे कर्मचारी लालसिंग नामदेव वाघमारे व सतीश रणपिसे यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांच्याकडून मेनगेटच्या चाव्या घेऊन मेनगेटचे कुलूप उघडून फरार झाले होते. या घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक निलेश महाडीक यांना माहिती मिळाली की, येरवडा मेंटल हॉस्पिटलमधून फरार झालेले दोन आरोपी भोर येथे लपून बसले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी खडकी पोलीस ठाण्याचे एक पथक भोर येथे रवाना करण्यात आले. पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त दिपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निलेश महाडिक, पोलीस कर्मचारी लक्ष्मण बांगर, बाबा शिर्के, राजेंद्र गुरव, गणेश लोखंडे, किरण घुटे यांच्या पथकाने केली.