Arthritis : आर्थरायटिसमुळे सांधे आणि हाडांचे डॅमेज, सुरक्षेसाठी ‘या’ 8 वस्तूंपासून राहा दूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आर्थरायटिस सांध्यामध्ये इन्फ्लेमेशनची एक गुंतागुंतीची समस्या आहे. हाडे आणि सांध्यामध्ये वेदना किंवा शरीराच्या कोणत्याही भागात त्रास आर्थरायटिसच्या प्रकारावर अवलंबून आहे. 40 टक्के पुरुष आणि 47 टक्के महिला आपल्या जीवनात आर्थरायटिसने ग्रस्त होतात. एक्सपर्ट सांगतात अनेक प्रकारचे फूड आणि पेय पदार्थ टाळल्याने इन्फलेमेटरी आर्थरायटिस आणि ऑस्टियोआर्थरायटिसच्या गंभीर लक्षणांचा धोका कमी होतो.

1. ग्लूटन कंटेनिंग फूड –
गहु, बार्ली आणि ओट्ससारख्या धान्यात असलेले ग्लूटेन इन्फ्लेमेशनची समस्या वाढवते. रहेयूमेटॉयड आर्थरायटिस टाळण्यासाठी ग्लूटेन-फ्री डाएट घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

2. रेड मीट –
रेड मीटचे जास्त सेवन इन्फ्लेमेटरी आर्थरायटिसचा धोका वाढवते.

3. शुगर –
आहारात शुगरचे प्रमाण जास्त असल्यास रहेयूमेटॉयड आर्थरायटिसची जोखीम वाढते.

4. जास्त मीठ –
एक्सपर्ट म्हणतात, आर्थरायटिसमध्ये मीठाच्या संतुलित प्रमाणाकडे लक्ष देणे आवश्यक असते. कॅन सूप, पिझा, चीज, प्रोसेस्ड मीट हे पदार्थ टाळावेत.

5. व्हेजिटेबल ऑईल –
ओमेगा-6 फॅटमध्ये हाय आणि ओमेगा-3 फॅटमध्ये लो डाएट सुद्धा ऑस्टियोआर्थरायटिस आणि रहेयूमेटॉइड आर्थरायटिसच्या बाबतीत धोकादायक आहे.

6. AGEs युक्त फूड –
हाय प्रोटीन किंवा हाय फॅट एनिमल फूड ज्यास फ्राईड, रोस्टेड, ग्रिल्ड किंवा ब्रॉइल युक्त डाएट AGEs चा मुख्य स्रोत आहे. अशा वस्तू खाऊ नयेत.

7. अल्कोहल –
इन्फ्लेमेटरी आर्थरायटिसने पीडित रूग्णांनी अल्कोहलचे सेवन बंद करावे.

8. प्रोसेस्ड फूड –
अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आयटम्समध्ये रिफाईंड ग्रेन्स, एक्स्ट्रा शुगर आणि अनेक प्रकारचे इन्फ्लेमेटरी इन्ग्रिडिएंड्स असतात. यामुळे आर्थरायटिसच्या रूग्णांच्या अडचणी वाढू शकतात.