home page top 1

कलम 370 ला मलेशियाचा विरोध, भारताने निषेध म्हणून घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द केल्यानंतर मलेशियाने पाकिस्तानचे समर्थन करत त्याला विरोध दर्शवला होता. मलेशियाच्या या कृतीचा निषेध म्हणून व्यापारी संघटनेनं मलेशियाकडून खाद्यतेल आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा कलम 370 रद्द करण्याचा निर्णय हा आततायी असल्याची टीका केली होती. त्यामुळे मलेशियाला धडा शिकवण्यासाठी व्यापारी संघटनेनं कुठल्याही स्थितीत मलेशियाकडून खाद्यतेल आयात न करण्याचा निर्णय व्यापारी संघटनेनं घेतला आहे.

भारत हा मलेशियाकडून सर्वात जास्त खाद्यतेल (पामतेल) आयात करणारा देश आहे. मलेशिया व्यतिरिक्त भारत इंडोनेशिया आणि थायलंडकडूनही खाद्यतेल आयात करतो. भारत जवळपास ७५ % हुन अधिक तेल मलेशियाकडून आयात करतो. मलेशिया हा जगातला सर्वाधिक खाद्यतेल उत्पादन करणारा देश आहे. भारताने खाद्यतेलावर बहिष्कार टाकल्यास अर्थव्यवस्थेवर मलेशियाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. भारताने जानेवारी ते सप्टेबर या काळात 3.9 मिलियन टन तेल मलेशियाकडून आयात केलं होतं. हा व्यवहार दोन अब्ज डॉलरचा होता.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like