मोदी सरकार कडून पुन्हा गुड न्युज ; आणखी घटणार जीएसटी चा दर 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जीएसटी संदर्भांत नुकत्याच झालेल्या ३१ व्या परिषदेदरम्यान काही वस्तूंवरील जीएसटी कमी करून मोदी सरकारने जनतेला दिलासा दिला. आता पुन्हा एकदा मोदी सरकार जीएसटी दर कमी करण्याच्या विचारात आहे याचे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले. भविष्यात १२ आणि १८ टक्क्यांच्यामध्ये एक नवीन स्टँडर्ड टॅक्स स्लॅब बनवण्यात येवू शकतो, असे जेटली यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या ब्लॉग वरून त्यांनी ही माहिती दिली.
काय आहे ट्विट 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी यशस्वी झाल्याचे सांगत नवीन जीएसटी दर लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. काही महागड्या उत्पादनाचा अपवाद वगळता देशात जीएसटीचा शून्य, ५ आणि स्टँडर्ड टॅक्स दर ठरवण्यात येईल, असे जेटली यांनी म्हटले आहे.

जीएसटीआधी ३१ टक्क्यांपर्यंतच्या टॅक्सवरून जेटली यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. फेसबुकवर लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये जेटलीने म्हटलं की, तंबाखू, लग्झरी गाड्या, एसी, सोडा वॉटर, मोठे टीव्ही आणि डिश वॉशर वगळता २८ टक्के जीएसटीच्या कक्षेत असलेल्या वस्तू १८ किंवा १२ टक्क्यांच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत.

सर्वसामान्य वापरत असलेले सीमेंट आणि ऑटो पार्ट्स हे केवळ २८ टक्क्यांच्या कक्षेत राहिले आहेत. त्यामुळे आमची पुढील प्राथमिकता ही सीमेंटवरील टॅक्स कमी करण्याची राहणार आहे. तर उर्वरित सर्व बिल्डिंग मटेरिअल्स २८ टक्क्यांवरून १८ व १२ टक्क्यांच्या जीएसटी कक्षेत आणले आहे, असे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय.