…म्हणून अरुणा इरानींना वाटत होती ‘प्राण’ यांची भीती, कोसळलं होतं रडू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अरुणा इरानी या भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण सिनेसृष्टी गाजवली आहे. बालकलाकार, खोडकर तरुणी, मादक आयटम गर्ल पासून अगदी अलिकडच्या हिरो-हिरोईनच्या आईपर्यंतच्या विविध भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्यांनी अनेकांसोबत काम केले. यामध्ये प्राण यांच्यासोबत देखील काम केले आहे. मात्र, प्राण यांनी साकारलेल्या खलनायकी पात्रांमुळे अरुणा इराणी यांना सुरुवातीला त्यांची भिती वाटत होती. त्यांनी एका टिव्ही शोमध्ये असाच एक किस्सा सांगितला आहे.

प्राण हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकरल्या. मात्र, त्यांच्या वाट्याला जास्त करुन खलनायकी भूमीका आल्या. त्यामुळे ते खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील खलनायकच असणार अशी शंका अनेकदा घेतली गेली. प्राण यांच्याबाबतीला प्रसंग सांगताना इराणी यांनी सांगितले की, प्राण त्यांचा बलात्कार करतील अशी भीती होती, त्यामुळे त्यांनी प्राण ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. त्या हॉटेलमध्ये न थांबता दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर एका रात्री अशी घटना घडली की, ज्यामुळे त्यांना रात्रभर आपलं रडू आवरता आलं नाही.

अरुणा इराणी या एका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी हाँगकाँग येथे गेल्या होत्या. त्या ज्या चित्रपटात काम करत होत्या. त्या चित्रपटात प्राण यांची देखील भूमिका होती. दरम्यान त्यांचे ज्या हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आले होते. त्या हॉटेलमध्ये काही समस्या निर्माण झाल्याने त्यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे याच हॉटेलमध्ये प्राण देखील होते. आणि त्यांची खोली प्राण यांच्या खोली शेजारीच होती. त्यामुळे त्या एवढ्या घाबरल्या होत्या की, त्यांना वाटू लागले की प्राण आपल्या खोलीत घसून त्यांचा बलात्कार करतील. कारण त्याकाळात प्राण हे चित्रपटांमध्ये कृर कृत्यांसाठी प्रसिद्ध होते. अन् खऱ्या आयुष्यात देखील ते असेच असतील असा गैरसमज त्यांचा झाला होता. मात्र त्यांना कोणताही त्रास झाला नाही. उलट काही मदत लागली तर मला फोन कर असा सल्ला त्यांनी दिला. त्यांचा दयाळूपणा पाहून त्यांना स्वत:ची लाज वाटू लागली. त्या रात्री अरुणा रात्रभर आपल्या खोलीत एकट्या ढसाढसा रडत होत्या. अरुणा यांनी सकाळ होताच प्राण यांची भेट घेऊन त्यांची माफी मागितली. एका टिव्ही शो मध्ये त्यांनी हा किस्सा सांगितला.

अरुणा इराणी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशभरातील त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अरुणा इराणी यांनी आजपर्यंत 500 पेक्षा अधिक चित्रपट आणि मालिकांमधून काम केले आहे. नर्तकी, गंगा की लहरे, फर्ज, उपकार, लैना मजनु, हम पांच, राजा बाबु, लाडला, सुहाग या सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अरुणा इराणी यांनी भूमिका साकारली आहे.