Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray | केजरीवाल यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, आज ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी प्रमुख नेते दिल्लीत

नवी दिल्ली : Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray | आज विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची (India Alliance) चौथी बैठक दिल्लीत होत आहे. बैठकीसाठी कालच आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, जेडीयू नेते नितीश कुमार, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी, शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, बैठकीपूर्वी काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे (Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray) यांच्यासह नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. ‘इंडिया’ची बैठक दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये दुपारी ३ वाजता होणार आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीला २८ पक्षांचे प्रमुख आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होऊ शकतो. इंडिया आघाडी जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. जागावाटपासाठी राज्यांमध्ये उपसमित्या स्थापना करण्याचे आघाडीतील पक्षांनी यापूर्वीच ठरवले आहे. (Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray)

दरम्यान, काल सोमवारी संध्याकाळी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, बैठकीत झालेल्या चर्चेवर केजरीवाल यांनी कोणतेही भाष्य केले नाही. यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | शिधापत्रिका पूर्ववत करुन देण्यासाठी लाच स्वीकारताना एकाला पुणे एसीबी कडून अटक

MNS Leader Sharmila Thackeray | आदित्यची बाजू घेतल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मानले आभार, पण शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ”जो भाऊ तुमच्यासोबत…”

आयटी इंजिनिअरला पार्ट टाईमचा पडला मोह; फाईव्ह स्टार रेटिंग देताना बँक खाते झाले रिकामे

खडकीमधील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 71 वी स्थानबध्दतेची कारवाई