Arvind Kejriwal On Nitish Kumar | नितीश कुमारांच्या PM पदाच्या दाव्यावर केजरीवालांचे सूचक वक्तव्य, म्हणाले – ‘देश सक्षम करायचाय, व्यक्ती नाही’

नवी दिल्ली : Arvind Kejriwal On Nitish Kumar | भाजपाविरोधी पक्षांची इंडिया आघाडी झाल्यापासून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, अशी चर्चा सातत्याने सुरू आहे. त्यातच बिहारचे मुख्यमंत्री आणि त्यांचे समर्थक पीएम पदासाठी जास्तच आक्रमक दिसत आहेत. याबाबत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अशा प्रकारचे दावे करत असलेल्या नेत्यांसाठी अतिशय सूचक वक्तव्य केले आहे (Arvind Kejriwal On Nitish Kumar ).

अरविंद केजरीवाल म्हणाले की, I.N.D.I.A. आघाडीसाठी आम आदमी पार्टी वचनबद्ध असून आघाडीपासून फारकत घेणार नाही. विरोधी आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप तयार नाही. यासाठी थोडा वेळ द्यावा. ते व्हायला हवे. माझ्या मते लवकरच याबाबत काही ठरेल. (Arvind Kejriwal On Nitish Kumar)

इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीबाबत केजरीवाल म्हणाले, आमची एकच भूमिका आहे.
आम्हाला अशी व्यवस्था निर्माण करायची आहे की, या देशातील १४० कोटी जनतेतील प्रत्येक व्यक्तीला पंतप्रधान पदावर असलेली व्यक्ती आपली वाटायला हवी.

केजरीवाल म्हणाले, आम्हाला देशाला आणि देशवासीयांना सक्षम बनवायचे आहे.
आम्ही कोणत्याही एका व्यक्तीला सक्षम बनवू इच्छित नाही.

आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील कामाविषयी माहिती देताना केजरीवाल म्हणाले, दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून दोन कोटी जनतेला सोबत घेऊन काम केले.
केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध सरकारी संस्थांनी अनेक
पावले उचलली आहेत. मागील आठ वर्षांत येथील प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे.

ते म्हणाले, आजची परिस्थिती आदर्श आहे असे नाही. परंतु ज्या मार्गावर आहोत तो योग्य असल्याचे अहवालावरून दिसते.
२०१४ च्या तुलनेत यंदा २०२३ मध्ये प्रदूषणात ३० टक्के घट झाली आहे. ही दिल्लीसाठी दिलासादायक बाब आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा

Pune PMC News | पीएमसी इंजीनियर असोसिएशनच्या वतीने ‘अभियंता दिन सायकल रॅली 2023’ चे आयोजन