Pune PMC News | पीएमसी इंजीनियर असोसिएशनच्या वतीने ‘अभियंता दिन सायकल रॅली 2023’ चे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | अभियंता दिनानिमित्त पीएमसी इंजिनियर असोससिएशनच्या (PMC Engineers Association) वतीने शनिवारी (दि.30) ‘अभियंता दिन सायकल रॅली 2023’ चे (Engineers Day Cycle Rally 2023) आयोजन करण्यात आले आहे. सायकल रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यांना फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. तसेच प्रथम सहभाग घेणाऱ्या सायकलस्वारांना टी-शर्ट देण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. (Pune PMC News)

सायकल रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सायकलस्वारांना रॅली समाप्त झाल्यानंतर अल्पोपहार व चहाची सोय करण्यात आली आहे. सायकल रॅलीत विनामूल्य प्रवेश दिला जाणार असून मर्यादीत 500 सायकलस्वारांना प्रवेश दिला जाणार आहे. सायकल रॅलीला शनिवारी (दि.30) सकाळी सात वाजता पुणे महापालिका मुख्य इमारतीपासून सुरुवात होणार आहे. प्रथम सहभाग घेणाऱ्या 500 सायकलस्वारांना सकाळी 6.30 वाजता टि-शर्ट वाटप करण्यात येणार आहे.

सायकल रॅलीमार्ग : मनपा भवन – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – अलका टॉकीज चौक – टिळक रोड – अभिनव कॉलेज – बाजीराव रोड – मनपा भवन.

संपर्क क्रमांक : ९६८९९३१७७७ / ९६८९९३७२७५ / ९९२१९७६९३८ / ८६६८७१२३८२ / ९६८९९३१५१४ / ९६८९९३९७९८ / ९६८९९३१०९४

सायकल रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर नाव नोंदणी करुन आपला सहभाग लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन पीएमसी इंजिनियर असोसिएशन पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे. (Pune PMC News)

सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://forms.gle/YTWZnjPnWTDqZJmdA

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा