Aryan Khan Drugs Case | समीर वानखेडेंसह NCB च्या दोन अधिकाऱ्यांचे फोन जप्त, सीबीआय चौकशीची तारीख ठरली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्स प्रकरणात खंडणी (Extortion Case) मागितल्याच्या आरोप प्रकरणी सीबीआय (CBI) आणखी अॅक्टिव्ह झाली आहे. सीबीआयने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासह दोन एनसीबी (NCB) अधिकाऱ्यांचे फोन जप्त (Confiscated Mobile Phone) केले आहेत. ही कारवाई (Aryan Khan Drugs Case) सोमवारी करण्यात आली. या सर्व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले जाणार आहे. समीर वानखेडे यांच्यासह विश्वविजय सिंग (Vishwavijay Singh), आशिष रंजन (Ashish Ranjan) यांचे वापरातील मोबाईल जप्त केले आहेत.

 

18 मे रोजी समीर वानखेडे यांची सीबीआयच्या पथकाकडून चौकशी (CBI Inquiry) केली जाणार आहे. या चौकशीपूर्वी मोबाईल जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली. सीबीआयने काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांच्या गोरेगावच्या घरी छापा टाकला होता. तेव्हाच समीर यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरचा (Actress Kranti Redkar) मोबाईलही जप्त केला होता. समीर वानखेडे यांच्या चौकशीनंतर विश्वविजय सिंग, आशिष रंजन यांनाही सीबीआय चौकशीचं समन्स बजावणार आहे.

 

काय आहे प्रकरण?

एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर (International Cruise Terminal) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफेड्रॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमच्या 22 गोळ्या आणि 1 लाख 33 हजार रुपयांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवरुन आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी (Aryan Khan Drugs Case) ताब्यात घेतले. यानंतर आर्यन खानसह इतर आरोपींवर एनसीबीने अमली पदार्थ कायद्यानुसार (Narcotics Act) गुन्हा दाखल करुन अटक केली होती.

 

या प्रकरणात आर्यन खान याच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यासह एनसीबी अधिकारी आणि या प्रकरणातला स्वतंत्र साक्षीदार केपी गोसावी (KP Gosavi) यांच्यावर करण्यात आला. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये या सर्वांची नावे आहेत. यानंतर एनसीबीने एसआयटीची (SIT) स्थापना केली. एसआयटी चौकशीत वानखेडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला होता.
यानंतर सीबीआयने कारवाईला सुरुवात केली.

 

समीर वानखेडे आणि आशिष रंजन यांनी त्यांच्या घोषित केलेल्या मालमत्तेपेक्षा अधिक संपत्ती मिळवली.
समीर वानखेडे यांनी केलेल्या परदेश वारीचे म्हणावे तसे स्पष्टीकरण व्हिजिलन्स टीमच्या चौकशीत दिले नाही.
तसेच महागडी घड्याळ आणि महागड्या गाड्या कोठून आल्या याचेही
उत्तर देण्यास वानखेडे असमर्थ राहिल्याचे सीबीआयने FIR मध्ये म्हटलं आहे.

 

 

 

Web Title :  JSB Bank Ltd | Kishor Bhagwan Tarwade unopposed as Director of Jaibhavani Sahakari Bank Ltd

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा