Pune Crime News | वानवडी पोलिसांकडून मोबाईल चोरी करणार्‍या उच्चशिक्षीत तरूणास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रामटेकडी येथील डिजीटल हबमध्ये (Digital Hub in Ramtekdi Industrial Area, Pune) परिक्षा देण्यासाठी आलेल्या परिक्षार्थींच्या बॅगेतील मोबाईल चोरी (Mobile Theft) करणार्‍या उच्चशिक्षीत तरूणास वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मोबाईलसह इतर ऐवज असा एकुण 96 हजार 500 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

ऋषीकेश प्रभाकर पाटील Rishikesh Prabhakar Patil (24, रा. के.के. मार्केटजवळ, धनकवडी, पुणे – KK Market Dhankawadi Pune. मुळ रा. मु. कराडी, पो. बोले, ता. परोला कराडी, जि. जळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रामटेकडील येथील डिजीटल हबमध्ये परिक्षा देण्यासाठी आलेल्यांनी त्यांच्याकडील बॅगा आणि मोबाईल आवारातील मोकळ्या जागेत ठेवल्या होत्या. परिक्षा दिल्यानंतर बॅग घेण्यासाठी विद्यार्थी गेले असता तेथे एका परिक्षार्थीची बॅग आणि एकाचा बॅगेतील मोबाईल गहाळ झाल्याचे समोर आले. संबंधितांनी वानवडी पोलिसांना त्याबाबतची खबर दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)

 

वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे (Sr PI Bhausaheb Pathare) यांनी चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास पथकातील अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे (PSI Santosh Sonawane) यांना सूचना केल्या होत्या. पीएसआय संतोष सोनवणे आणि पोलिस अंमलदार अमोल गायकवाड (Police Amol Gaikwad) आणि विठ्ठल चोरमले (Police Vittal Chormale) हे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याव्दारे संशयिताचा शोध घेत होते. त्यांना आरोपीबाबत माहिती मिळाली असता त्यांनी सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने बॅग आणि मोबाईल चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मोबाईल, इंजिनिअरिंग कॅल्क्युलेटर आणि बॅग तसेच इतर ऐवज असा एकुण 96 हजार रूपचाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी ऋषीकेश प्रभाकर पाटीलचे बीसीएसपर्यंत शिक्षण झालेले असून तो पुण्यातील एका कंपनीमध्ये अ‍ॅप्रेंटीसशीप करीत आहेत.

पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहाय्यक पोलिस आयुक्त पोर्णिमा तावरे (ACP Purnima Taware),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे,
पोलिस हवालदार नाईक, पोलिस हवालदार कदम, पोलिस नाईक गोसावी, पोलिस अंमलदार चोरमले,
पोलिस अंमलदार गायकवाड, पोलिस अंमलदार सुतार आणि पोलिस अंमलदार राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Wanwadi police arrested a young man who stole a mobile phone

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा