Aryan Khan Drug Case |  आर्यन खान प्रकरण घडवून आणलं ! त्याला 100 % अडकवले गेले, NCB चा साक्षीदार विजय पागारेंचा खळबळजनक दावा (व्हिडीओ)

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drug Case) दिवसेंदिवस नवी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला (Aryan Khan Drug Case) वेगळे वळण मिळत आहे. याप्रकरणातील साक्षीदार (witness) विजय पगारे (Vijay Pagare) यांनी मोठा गौप्यस्फोट करुन खळबळ उडवून दिली आहे. आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात 100 टक्के अडकवण्यात आले असून हे संपूर्ण प्रकरण घडवण्यात आले आहे, असा खळबळजनक दावा पगारे यांनी केला आहे. एवढेच नाही तर या प्रकरणात मोठी डील करण्यात आली होती, परंतु ती फसली अशी खळबळजनक माहिती पगारे यांनी दिली आहे.

 

विविध वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत विजय पगारे यांनी खळबळजनक माहिती दिली आहे.
विजय पगारे यांनी या कारवाईच्या आगोदर दोन दिवस आधी काय काय घडले याची सविस्तर माहिती दिली आहे.
ही माहिती देनाता अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान याला 100 टक्के अडकवण्यात आल्याचे छातीठोकपणे त्यांनी सांगितले.
सुनील पाटील (Sunil Patil), मनीष भानुषाली (Manish Bhanushali) आणि किरण गोसावी (Kiran Gosavi) यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 

किरण गोसावीने 50 लाख रुपये घेतले

 

आर्यन खान ड्रग्स प्रकरण (Aryan Khan Drug Case) ही संपूर्ण कारवाईच ठरवून केलेली कारवाई आहे.
किरण गोसावी याने या प्रकरणात 50 लाख रुपये घेतले. या प्रकरणाच्या संपूर्ण डीलमधील काही रक्कम अधिकाऱ्यांना जाणार होती.
सुनील पाटील हे मला स्वत: बोललेला आहे. सुनील पाटील याचे एनसीबीचे (NCB) प्रादेशिक संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशी सतत बोलणं होत होते.
माझ्यासमोरच हे बोलणे झालं आहे, असा खळबळजनक दावा पगार यांनी केला आहे.
तपास अधिकारी मनीष भानुशाली आणि सुनील पाटील यांची योग्य प्रकारे तपासणी केल्यास संपूर्ण प्रकरण बाहेर येईल, असेही पगारे यांनी सांगितले.

 

क्रूझवरील छाप्याच्या आधी नेमकं काय शिजलं

 

या प्रकरणाचा पर्दाफाश करताना पगारे म्हणाले की, सुनील पाटील याच्यासोबत मी मागील पाच सहा महिन्यांपासून काम करत आहे. ते माझ्यासाठी एक काम काढून देणार होते.
त्यांना मी पैसेही दिलेले होते. मी गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्याकडे पैसे मागत होतो.
मी त्यांच्यासोबत ‘द ललित’ हॉटेलमध्ये (Hotel The Lalit) देखील थांबलो. केवळ ललितच नाही, तर आणखीही काही हॉटेलमध्ये मी त्यांच्यासोबत राहिलो आहे.

 

भाऊ, बडा गेम हो गया

 

27 सप्टेंबर या दिवशी वाशी मधील फॉर्च्युन हॉटेलमध्ये (Fortune Hotel) दोन रुम बुक करण्यात आल्या होत्या.
त्या दिवशी हॉटेलमध्ये संध्याकाळी साडे सातच्या सुमारास मनीष भानुशाली आणि एक जाड मुलगी आली.
मी, किरण गोसावी आणि सुनील पाटील असे आम्ही तिघे दुसऱ्या रुममध्ये बसलो होतो.
मनीष भानुशाली त्याच्या रुममधून दोन तासांनी बाहेर आला.
यावेळी त्यांनी सुनील भाऊंची पप्पी देखील घेतली. तो म्हणाला, भाऊ, बडा गेम हो गया.
आपने को अभी के अभी अहमदाबाद निकला है. नाना (विजय पगारे) को नही लेना है. मी हे ऐकल्यानंतर म्हणालो की, तुमचे काय असेल ते असेल.
पण माझे पैसे मला मिळाले पाहिजेत. तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, चिंता करु नका असे सुनील पाटील म्हणाले.
तसेच आम्ही येईपर्यंत रुम सोडायचा नाही, असेही आम्हाला बजावले होते, असे पगारे यांनी सांगितले. (Aryan Khan Drug Case)

 

गाडीवर पोलीस प्लेट आणि पोलीस कॅप

 

27 सप्टेंबरला रात्री 11.30 ते  12 च्या सुमारास एमएच 12 3000 या इनोव्हा गाडीत गोसावी, भानुशाली आणि सुनील पाटील बसले.
गाडीवर पोलीस प्लेट आणि पोलीस कॅप होती.
ते अहमदाबादला जायला निघाले. दुसऱ्या दिवशी 28 तारखेला मी संध्याकाळी पाटील यांना फोन केला.
परंतु त्यावेळी ते अहमदाबादला पोहोचले नसल्याचे त्यांनी मला सांगितले. कारण मध्ये गाडीचे काही काम निघाल्याने त्यांना उशीर झाला.
29 ऑक्टोबरला त्यांना फोन केला. तेव्हा तू आराम कर, तुझे पैसे तुला मिळतील, असे सांगितले.
त्यानंतर सुनील पाटील यांनी फोन केले मात्र, प्रत्येक वेळी ते मला तुझे पैसे मिळतील असेच सांगत होते, असे पगारे यांनी सांगितले.

 

Web Title : Aryan khan drugs case | NCB witness vijay pagare has made a sensational claim that aryan khan drug case was formed and aryan was implicated in it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gram Suraksha Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनेत मिळताहेत बंपर रिटर्न, रोज 50 रुपये बचत केल्यास 35 लाख मिळतात ‘रिटर्न’; जाणून घ्या

Nawab Malik Daughter | ‘पेडलरची पत्नी म्हटले गेले, मुलांनी मित्र गमावले’, नवाब मलिकांच्या मुलीचे खुले पत्र

Asaram Bapu | जेलमध्ये बंद आसाराम एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल, 5 दिवसांपासून आहे ताप