Aryan Khan Drugs Case | आर्यन खान प्रकरणात एका तपास यंत्रणेचे थोबाड फुटले; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. त्या आधारेच सामनातून खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) बोचरी टीका केली आहे. एका केंद्रीय तपास यंत्रणेचे (central investigation agency) आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Drugs) थोबाड फुटले आहे. इतरांचेही लवकरच तसे होईल. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपप्रणीत कट कारस्थानामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यात कारवाई करण्यात येत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला.

 

मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानने (Aryan Khan Drugs) ) अमली पदार्थ बाळगल्याचा तसेच सेवन केल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच आर्यनच्या मोबाईलवरील संभाषणात ही कट कारस्थानासंदर्भात कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे एनसीबीच्या (NCB) टोळीने बनाव रचून आर्यन खानसह सुमारे २० ते २५ मुलांना विनाकारण तुरुंगात ठेवले. एनसीबीने आर्यनवर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे निरीक्षण जर न्यायालयाने नोंदवले असेल तर मुलांना अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक अधिकारी गजाआड झाला पाहिजे. एनसीबीच्या वादग्रस्त कारवायांच्या खोटेपणाचे रोज नवे पुरावे समोर येत आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी फक्त महाराष्ट्रासारख्या राज्यात डेरा टाकून सुरू केलेले नसते उद्योग हेच मोठे कारस्थान दिसते. या कारस्थानाची किंमत चुकवावी लागेल, असे शरद पवारांसारखे (Sharad Pawar) ज्येष्ठ नेते सांगतात. त्यांनी जे सांगितले त्या मागे लोकभावना आहे. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांनी जो खेळ सुरु केला आहे त्याची (Aryan Khan Drugs Case) रोज पोलखोल सुरु असल्याचे शिवसेनेने म्हंटले आहे.

 

एनसीबी म्हणजे खंडणी उकळणारे टोळ भैरवच

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (narcotics control bureau) हे महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करून खंडणी, गाडी-घोडे उकळणारे टोळभैरवच बनले होते.
आणि त्याचे समर्थन भाजपचे लोक करत होते.
नवाब मलिक (Nawab Malik) यांनी NCB च्या टोळीचे कारनामे पुराव्यांसह समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे
हे महाराष्ट्रावर उपकार आहे. याच टोळधाडीने स्वतः मलिक यांच्या जावयावर खोटे गुन्हे दाखल करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला.
फिल्मस्टार, त्यांची मुले, व्यापारी, राजकारण्यांचे नातेवाईक यांना खोट्या गुन्ह्यात
अडकवून खंडण्या उकळणाऱ्या केंद्रीय यंत्रणांचा प्रताप सुरु असून त्या विरोधात महाराष्ट्रात रोष निर्माण झाला आहे.

 

देशात सुरु असलेले शेतकरी आंदोलन, महागाईविरुद्धचा रोष यावरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी
‘क्रूझ शिप ड्रग्ज’ प्रकरणात आर्यन खानला अडकवले, असे बोलले जाते.
मात्र त्यातही २५ कोटींच्या खंडणीचा विषय धक्कादायक आहे.
पाव-दोन ग्रॅम चरस पकडून एनसीबीचे अधिकारी तोरा दाखवीत होते,
पण नवाब मलिक यांनी त्यांची अनेक बाबतीतील बनावटगिरी सिद्ध केली आहे, तेव्हापासून भाजपची वाचा गेली आहे.
ईडीने मुंबईत केलेल्या कारवाया व धरपकडी ‘एनसीबी छाप’च आहेत, असा थेट आरोप शिवसेनेने केला आहे.

 

Web Title :- Aryan Khan Drugs Case | shah rukh khan son aryan khan drugs case burst central investigation agency then bjp has been mute shiv senas fierce criticism aryan khan issue mumbai high court-marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा