Aryan Khan | आर्यन खानच्या निर्दोषत्वाला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या अमली पदार्थप्रकरणी म्हणजे ड्रग्स क्रूज पार्टीप्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे आणि अ‍ॅड. सुबोध पाठक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्स क्रूज पार्टीच्या वेळी घटनास्थळी रंगेहात पकडला गेला असून, तपास अधिकाऱ्यांसमोर त्याने गुन्हा कबूल केला होता. त्यामुळे न्यायालयानेदेखील दोन वेळा त्याचा जामीन नाकारला होता. मात्र, न्यायालयाने आर्यन खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना निर्दोष मुक्त केले. त्यामुळे आम्ही त्याच्या सुटकेला न्यायालयात आव्हान देत आहोत, असे हिंदू महासंघाने स्पष्ट केले.

 

उच्च न्यायालयाने ड्रग्स क्रूज पार्टी या प्रकरणात आर्यन खानला जामीन दिला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यासाठी 13 जुलै 2022 रोजी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे. या ड्रग्स क्रूज पार्टीच्या तपास प्रक्रियेत तपास यंत्रणा किती गाफील राहिल्या, त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन या सर्व आरोपींना मदत केल्याचे मुद्दे या याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. त्याबाबतची सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचे दवे आणि अ‍ॅड. पाठक यांनी सांगितले. त्यामुळे शाहरुख खान याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Aryan Khan | hindu mahasabha file petition against aryan khan clean chit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या