भंगारातही विकली जात नाही ‘INS विराट’ युद्धनौका, जाणून घ्या सविस्तर वृत्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  ‘INS विराट’ या ऐतिहासिक विमानवाहू युद्धनौकेचे अनन्यसाधारण महत्व आहे. असे असले तरी सेवानिवृत्त झालेल्या या भारतीय नौदलातील या विमानवाहू जहाजाला भंगारात विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय नौदलाने हा निर्णय घेऊन या युद्धनौकेचा ई-लिलाव केला होता. परंतु कुणी खरीददार न मिळाल्याने लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी ठेवीच्या रूपात ५ कोटी ३ लाख रुपये अग्रिम रक्कम जमा करणे अनिवार्य होते.

खरतर या बाबतीत राज्यसरकारने निर्णय घेत INS विराटचे कमर्शियल बिझनेस कॉप्लेक्समध्ये रुपांतर करण्यासाठीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला होता. आणि या प्रस्तावानुसार, विराट संग्रहालयाची निर्मिती ही समुद्रात काँक्रिटचा पाया तयार करून केली जाणार असे प्रस्तावात नमुद होते. यासाठी निविदेचे नियम आणि अटी निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समितीही गठित करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणाऱ्या निवटी रॉक्सपासून सुमारे ७ समुद्रीमैल इतक्या अंतरावर एक जागा निश्चित करण्यात येणार होती. परंतु यासाठी कुणीही पुढे येऊन पाठिंबा दर्शविला नाही की कुणी यासंदर्भात आपली सहमती दर्शवली नाही. असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच हे जहाज भंगारात विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे समजते.

या जहाजाबाबत सांगायचे झाले तर या जहाजाचे नाव जगातील सर्वात दीर्घकाळ सेवा देणारे मोठे जहाज म्हणून गिनीज बुकात नोंद आहे. तसेच ‘द ग्रँड ओल्ड लेडी’ असेही या जहाजास संबोधले जाते. हे जहाज दीर्घकाळ भारतीय नौदल आणि रॉयल नेव्हीच्या सेवेत होते. एप्रिल १९८६ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने HMS हार्मिसला ६.३ कोटी डॉलरमध्ये खरेदी करण्यासाठी ब्रिटनसोबत करार केला होता. त्यानंतर HMS हार्मिसची डागडुजी करण्यात आली तसेच नव्या उपकरणांची खरेदी करून हे बलाढ्य असे ताकदवान जहाज सन १९८७ मध्ये ते INS विराटच्या रुपात भारतीय नौसेनेच्या नौकांच्या ताफ्यात सामील केले गेले. या जहाजाचे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्व आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/