Asaduddin Owaisi | ‘नवाब मलिक जेलमध्ये आहेत, मग अजित पवार बाहेर कसे?’ असदुद्दीन ओवैसींचा सवाल (व्हिडीओ)

लखनौ : वृत्तसंस्था – Asaduddin Owaisi |महाराष्ट्राचे (Maharashtra) अल्पसंख्याक मंत्री (Minority Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं (ED) बुधवारी अटक (Arrest) केली. त्यांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ईडीच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यासंदर्भात राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना यावरुन एमआयएम पक्षाचे खासदार (MIM MP) असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) सध्या उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रचारसभेमध्ये शनिवारी बोलताना त्यांनी समाजवादी पक्षासोबत (Samajwadi Party) राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील निशाणा साधला, आजम जेलमध्ये असताना अखिलेश यादव (Akhilesh Yadav) बाहेर कसे आहेत हे सांगा. सपावाल्यांनो, तुम्ही माझा सामना करु शकणार नाहीत, असे ते म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या अटकेवर देखील निशाणा साधला.

 

 

महाराष्ट्रात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात जलसिंचन घोटाळ्याचा (Irrigation Scam) आरोप आहे. ते बाहेर आहेत आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत, काय होतंय हे? असा सवाल त्यांनी केला.

 

 

Web Title :- Asaduddin Owaisi | mim chief asadussin owaisi targets ajit pawar ncp on nawab malik arrested by ed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | 3 रुपये 71 पैशांच्या ‘या’ शेयरने 1 लाखाचे केले रू. 6.53 कोटी, आता जाईल रू. 2600 पर्यंत, एक्सपर्ट आहेत बुलिश

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादयक! राज्यात गेल्या 24 तासात 1761 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Shiv Tandav Song By Amruta Fadnavis | अबब..! अमृता फडणवीस यांच्या ‘शिव तांडव’ला अगदी कमी कालावधील मिळाले लाखोंमध्ये व्ह्यूज