Asha Negi | मिस उत्तराखंड ते लोकप्रिय अभिनेत्री…आशा नेगी बनली आहे प्रसिद्ध अभिनेत्री

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या दिलखेचक अदांनी व अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री आशा नेगी (Asha Negi) ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आशाने अनेक मालिकांमध्ये व जाहिरांतीमध्ये काम केले असून आपल्या कामाने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आशा नेगी आज प्रसिद्ध चेहरा बनली असून तिचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. सोशल मीडियावर देखील सक्रिय असणारी आशा आपले हॉट फोटोशूट (Asha Negi Hot Photoshoot) चाहत्यांसोबत शेअर करायला कधीही विसरत नाही. तिचे इंस्टाग्रामवर 2.2 मिलियन्स फॉलोवर्स असून ती एकाही व्यक्तीला फॉलो करत नाही. लोकप्रिय अभिनेत्री आशा नेगी (Asha Negi) हिचा वाढदिवस असून ती तिचा 34 वा वाढदिवस (Asha Negi Birthday) साजरा करत आहे.

मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आशा नेगी हिचा जन्म 23 ऑगस्ट 1989 रोजी उत्तराखंडातील देहराडून येथे झाला आहे. मनोरंजन विश्वाशी कोणातही संबंध नसणाऱ्या आशाने अचानक या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. तिने 2009 साली मिस उत्तराखंड या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि ती या स्पर्धेमध्ये विजेती ठरली. या मिस उत्तराखंड (Asha Negi Miss Uttarakhand) असलेल्या आशा नेगीला मुंबई शहराचे वेध लागले आणि तिला मनोरंजन विश्व खुणावू लागले.

उत्तराखंडहून मुंबईला आलेल्या आशा नेगीने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. त्यानंतर तिला मालिकांमध्ये काम मिळण्यास सुरुवात झाली. या इंडस्ट्रीमध्ये आशाने आत्मविश्वासाने पाऊल ठेवले आणि अभिनयाची बळावर वेगळी ओळख निर्माण केली. आज मालिकांविश्वामध्ये अभिनेत्री आशा नेगी हा एक लोकप्रिय चेहरा बनला आहे. ‘सपनों से भरे नैना’ (Sapnon Se Bhare Naina) या हिंदी मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यामध्ये तिने मधुरा हे प्रभावी पात्र साकारले होते. त्यानंतर तिला प्रसिद्ध मालिका ‘बड़े अच्छे लगते हैं’ (Bade Achhe Lagte Hain) या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिने महत्त्वाचे पात्र साकारले होते. त्याच बरोबर अभिनेत्री आशा नेगी हिची ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या मालिकेतील भूमिका देखील खूप गाजली.

अभिनेत्री आशा नेगी हिने 2011 साली ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमध्ये काम केले. यामध्ये तिने अर्चना देशमुख म्हणजेच अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande) दत्तक मुलीची पूर्वा देशमुख ही भूमिका केली होती. तिचे हे पात्र आणि तिने केलेला अभिनय यामुळे घराघरात आशाचा चाहता वर्ग निर्माण झाला. या मालिकेतील भूमिकेबद्दल तिला गोल्ड अवॉर्ड देखील मिळाला होता. मालिकांबरोबर आशा नेगी हिने अनेक रियलिटी शो (Asha Negi Reality Show) मध्ये देखील सहभाग नोंदवला आहे. ‘नच बलिए 6’ (Nach Baliye 6) मध्ये तिने ऋत्विक धनजानी (Rithvik Dhanjani) सोबत स्पर्धत सहभागी होऊन हा शो जिंकला देखील होता. त्याचबरोबर ती ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) या लोकप्रिय रियलिटी शो मध्ये देखील सहभागी झाली होती. यामध्ये तिच्या दमदार खेळी सर्वांना आश्चर्य वाटले होते.

अभिनेत्री आशा नेगी (Asha Negi) हिने अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या असून आपल्या अभिनयाची छाप
प्रेक्षकांवर उमटवली आहे. तिच्या अभिनयावर व सौंदर्यावर मोठा चाहता वर्ग फिदा आहे.
तिचे टीव्ही विश्वातील अभिनेता ऋत्विक धनजानी सोबत रिलेशनशिप
(Asha Negi And Rithvik Dhanjani Relationship) खूप गाजले होते. पवित्र रिश्ता मालिकेच्या सेटवर त्याची
ओळख झाली होती. आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. आशा आणि ऋत्विकची जोडी ही लोकप्रिय होती.
ते सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते पण नंतर त्यांनी ब्रेकअप केल आणि आता ते आपापल्या वाटेवर आहेत.
अभिनेत्री आशा नेगी ही मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असून आज तिचा वाढदिवस आहे.
सोशल मीडियावर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nora Fatehi | डान्सर नोरा फतेहीच्या कलरफुल बॉडीकॉन वन पीस ड्रेसने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून तरुणाचा खून; प्रचंड खळबळ