Nora Fatehi | डान्सर नोरा फतेहीच्या कलरफुल बॉडीकॉन वन पीस ड्रेसने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

ADV

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची साकी साकी फेम डान्सर अर्थात नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावते. तिच्या कातील डान्सवर तर सर्व प्रेक्षक फिदा आहेत. पण डान्स बरोबरच नोराची हटके आणि बोल्ड फॅशन (Nora Fatehi Bold Photo) देखील चर्चाचा विषय ठरत असते. नोरा ही नेहमी हॉट आणि बिनधास्त अवतारामध्ये झळकते. नोराची स्टाईल ही दिलकेचक आणि आकर्षक असते. सध्या नोराच्या (Nora Fatehi) अशाच हटके फॅशनची एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तिने शॉर्ट वन पीस कॅरी केला आहे.

डान्सर नोरा फतेही ही वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशनमध्ये हॉट फोटोशूट (Nora Fatehi Hot Photoshoot) करत असते. आणि फोटोशूट ती सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यासोबत शेअर देखील करत असते. यावेळी तिला पापाराझीनी स्टनिंग आऊटफिटमध्ये स्पॉट केले. यावेळी नोरा फतेही हिने कलरफुल बॉडीकॉन वन पीस ड्रेस परिधान केला होता. तसेच तिने घातलेली केसांची लांबलचक वेणी देखील लक्षवेधी ठरत होती. ग्लोईंग मेकअप केलेली नोरा या आऊटफिटमध्ये पापाराझींना एका हून एक कातील पोज देत होती. सोबतचे तिने स्टाईल केलेले हेव्ही इयररिंग देखील तिला सूट करत होते. डान्सर नोरा फतेहीचा हा हॉट लूक चाहत्यांना आवडला असून अनेकांनी तिला कमेंट करत तिच्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून तरुणाचा खून; प्रचंड खळबळ