Asha Workers Strike | राज्यव्यापी बेमुदत संप! राज्य सरकारने आश्वासन न पाळल्याने आशा स्वयंसेविका आक्रमक

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) मोबदला वाढीचे दिलेले आश्वासन न पाळल्याने आशा स्वयंसेविका (Asha Workers Strike) आणि गटप्रवर्तकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास १२ जानेवारीपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नुकतेच अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन (Asha Workers Strike) केले होते, आता आशा स्वयंसेविकांनी देखील संपाचे हत्यार उगारल्याने राज्य सरकारची तारांबळ उडणार आहे.

आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात ७ हजार, तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० रुपयांनी वाढ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये दिले होते.

मात्र अद्याप त्यावर शासन निर्णय काढण्यात आला नसल्याने आशा स्वयंसेविकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
यामुळेच महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

राज्यात ७० हजार आशा स्वंयसेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत.
मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान संप पुकारला होता.

यावेळी आरोग्य मंत्र्यांनी १ नोव्हेंबर २०२३ ला कृति समितीसोबत बैठक घेऊन आशा दिवाळी भेट म्हणून दोन हजार रुपये,
आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्यात ७ हजार आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० रुपयांनी वाढ करण्याचे आश्वासन दिले.
याशिवाय संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास मोबदला देण्याचेही मान्य केले. मात्र गटप्रवर्तकांच्या मानधनात समाधानकारक वाढ न केल्याने संप पुढे लांबला. (Asha Workers Strike)

मुख्यमंत्र्यांसोबत ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत गटप्रवर्तकांचे मानधन १० हजार रुपये करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी
अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना दूरध्वनीवरून दिल्या. यामुळे संप स्थगित करण्यात आला.
१० नोव्हेंबरपासून आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी आ.भा. कार्ड आणि गोल्डन कार्ड काढणे, पीएमएमव्हीवायचे
अर्ज ऑनलाईन भरणे अशी कामे पूर्ण केली.

परंतु, संपकाळात कपात केलेला मोबदला अजूनही दिलेला नाही. मानधनात वाढ करण्याच्या आश्वासनाचा शासन
निर्णय देखील सरकारने जारी केलेला नाही. शासन निर्णय जारी करण्याच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात
१८ डिसेंबर रोजी मोर्चा काढूनही दखल न घेतल्याने आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांमध्ये संताप वाढला.

यामुळे २९ डिसेंबरपासून त्यांनी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
तसेच शासन निर्णय जारी न केल्यास १२ जानेवारीपासून सर्व आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक राज्यव्यापी बेमुदत संपावर जातील, असा इशारा दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | मोठी बातमी! ‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची धाड, आमदार रोहित पवार अडचणीत

जमीन देण्याच्या बहाण्याने 21 लाखांची फसवणूक, खराडी परिसरातील प्रकार

Firing On Sharad Mohol In Kothrud Pune | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात गोळीबार, एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती

पुणे: तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची दीड कोटींची फसवणूक, तिघांवर FIR