Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे: तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची दीड कोटींची फसवणूक, तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची 1 कोटी 66 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत हडपसर येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अमृता नितीन पाटील (वय-33 रा. हडपसर) यांनी गुरुवारी (दि.4) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून मल्लीनाथ अन्नाप्पा सुतार (रा. मु.पो. शिंगडगाव, वळसंग, सोलापूर), किशोर नवनाथ शिंदे, प्रतिक प्रभाकर शिंदे (दोघे रा. मु.पो. मेंढापूर, ता. पंढरपुर) यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना शेअर मार्केटची (Stock market) माहिती दिली. गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर तीन टक्के परतावा देण्याचे आश्वासन देऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपींनी वेगवगेळ्या बँकेतून फिर्यादी यांच्या नावावर एक कोटी 66 लाख रुपयांचे कर्ज (Loan) घेतले. कर्जाची रक्कम आरोपींनी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही. आरोपींकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सी.सी. थोरबोले (API C.C. Thorbole) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे: दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रॉडने मारहाण, तिघांना अटक

तरुणीला मारहाण करुन अश्लील शिवीगाळ, विनयभंग केल्याप्रकरणी एकावर FIR; हडपसर परिसरातील घटना

Pune News | कात्रज दूध डेअरी लगतच्या जागेवरील मैदानाचे आरक्षण उठविण्यावरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष

पैसे चोरल्याच्या संशयावरून कामगाराचा खून, एकाला अटक; वडगाव मधील घटना