तरुण अभिनेत्रींनाही लाजवेल असं आहे अश्विनी भावे यांचं सौंदर्य आणि ग्लॅमर ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी इंडस्ट्रीपासून बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावेंना आपण सर्वजण ओळखतोच. मराठी मध्यम वर्गीय कुटुंबातील अश्विनी भावेंनी हिंदी सिनेमाताही आपली ओळख बनवली आहे. ग्लॅमरगर्ल अश्विनी भावेंचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. एकेकाळी अश्विनी भावे यांना मायक्रोबायोलॉजीमध्ये करिअर करायचं होतं.

https://www.instagram.com/p/Bp_MZ8mFLEb/

अश्विनी भावेंचा कल मात्र कला शाखेकडे जास्त होता. त्यांची हीच आवड त्यांना कलाक्षेत्रात घेऊन आली आणि अश्विनी यांनी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. लग्नानंतर अश्विनी परदेशी स्थायिक झाल्या. किशोर बापुर्डीकर यांच्याशी विवाहबद्ध होत अश्विनीने आपला संसार थाटला. आपली सिनेमाची आवड त्यांना गप्प बसू देत नव्हती. लग्नानंतर अश्विनीने फिल्म मेकींगच्या कोर्सला प्रवेश घेतला. हा कोर्स चार वर्षांचा होता.

शाब्बास सुनबाई या सिनेमातून अश्विनी यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. स्वत: राज कपूर यांनी अश्विनीचं काम पाहिलं होतं. कळत नकळत असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात अश्विनी काम पाहिल्यानंतर राज कपूर यांनी त्यांना स्क्रीन टेस्टसाठी बोलवलं होतं. यानंतर अगदी सहज अश्विनीला हीना हा सिनेमा मिळाला. अश्विनी यांनी सैनिक या सिनेमात खिलाडी अक्षय कुमारसोबतही काम केलं आहे.

अश्विनी भावे सध्या परदेशी आहेत. त्या राहायला जरी परदेशात असल्या तरी दरवर्षी आपल्या मुलांना घेऊन भारतात येतात. मुलांना भारत कळला पाहिजे असं त्यांना वाटतं.