मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने गरिबांसाठी एक शिधा वाटप योजना सुरू केली आहे. तशीच एक योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. ती म्हणजे एसआयटी वाटप. मागेल त्याला हे सरकार एसआयटी देत बसले आहे. एसआयटी म्हणजे विशेष तपास पथक महत्वाच्या आणि गंभीर गुन्ह्यांसाठी स्थापन केले जाते. पण जे प्रश्न आणि जे गुन्हे पोलीस आणि सीबीआयने निकाली काढले आहेत, त्यांच्यावर देखील नव्याने एसआयटी चौकशी लावली जात आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केले होते. त्यावरून मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांना टोला लावत सल्ला दिला आहे. संजय राऊतांनी बोलघेवडेपणा बंद करुन रामरक्षा म्हणावी, असा सल्ला आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला.
संजय राऊत यांच्या तोंडाला सत्य बोलायची सवयच नाही. ते रोज सकाळी उठून रामरक्षा म्हणायच्या ऐवजी रावणरक्षा म्हणतात. रोज सकाळी उठले की रावणरक्षा म्हणत राहायची हे त्यांचे काम आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये गोरगरीब जनतेसाठी केलेले एक काम सांगा. सकाळी उठायचे बोलघेवडेपणा करायचा हा त्यांचा उद्योग आहे. त्यामुळे तुम्ही बोलघेवडेपणा कमी करा आणि रामरक्षा म्हणा, असे शेलार म्हणाले.
.@rautsanjay61 तुम्ही बोलघेवडेपणा बंद करा… रामरक्षा म्हणा, रावणरक्षा म्हणणे बंद करा…@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @cbawankule pic.twitter.com/yWrA6ngEvg
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 24, 2022
तसेच उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या ताटाखालची मांजर झाली आहे. तेच जयंत पाटील बोलले आणि त्याला भास्कर जाधव यांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे स्वाभिमान, मर्द, मराठी, हिंदुत्व या भाषा संजय राऊत आता तुम्हाला झेपत नाहीत. तुम्हाला हे शोभत नाही, ते बंद करा असेही शेलार म्हणाले.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एसआयटीच्या अती आणि बेछूट वापरावर भाष्य केले होते.
राऊत म्हणाले, केंद्र सरकारने रेशनची नवीन योजना जाहीर केली आहे.
गरिबांना रेशन देण्यासंदर्भात त्यांनी योजना आणली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने देखील एसआयटीचे रेशन
सुरू केले आहे. मागेल त्याला एसआयटी दिली जात आहे.
महाराष्ट्रातून शिवसेनेचे 40 आमदार ज्या पद्धतीने 50 खोके देऊन फोडण्यात आले, तो काय व्यवहार होता,
त्यावर एक एसआयटी स्थापन व्हायला हवी. पण जे विषय पोलीस, सीबीआयने संपवले आहेत,
त्यावर एसआयटी स्थापन करून तुम्ही सत्तेचा गैरवापर करत आहात.
Web Title :-Ashish Shelar | bjp leader ashish shelar takes jibe on sanjay raut statement
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update