Ashish Shelar | ‘दाऊदच्या बिल्डिंगवर कारवाईची हिंमत होत नाही पण राणेंच्या बंगल्यात दुर्बिन लावून शोधकार्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- Ashish Shelar | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईतील जुहू येथील आदिश बंगल्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई पालिकेने Brihanmumbai Municipal Corporation (BMC) 15 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. या कालावधीत त्यांनी बंगला हटवणं अपेक्षित आहे नाहीतर महापालिका स्वत: कारवाई करणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

 

शिवसेनेची (Shivsena) गेल्या 25 वर्षामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Underworld Don Dawood Ibrahim) टेंमकर मुल्ला, पाकमोडिया स्ट्रीट, मेमनच्या अल – हुसैनी बिल्डिंग, मोहम्मद अली रोड, मालवणीतील अनधिकृत बांधकामांवर (Illegal Construction) हातोडा उगरण्याची हिंमत नाही. मात्र नारायण राणेंच्या बंगल्यात दुर्बिन लावून शोधकार्य सुरू, असा टोला आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला लगावला आहे.

 

नारायण राणे यांच्या बेकायदा बांधकामाच्या तक्रारीनंतर पालिकेने बंगल्याची पाहणी केली.
त्यानंतर 4 मार्चला त्यांना पालिकेने नोटीस (Notice) पाठवली आणि बेकायदा बांधकामाबाबत काही प्रश्न विचारले.
त्यावर बंगल्यातील बांधकाम हे अधिकृत असल्याचा दावा वकिलांनी केला. मात्र पालिकेने हा दावा फेटाळून लावला आहे.

 

दरम्यान, आशिष शेलार यांनी दाऊदच्या प्रॉपर्टीचा दाखला देत शिवसेनेवर निशाणा साधला.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना दाऊदसोबत मनी लॉन्ड्रिंगच्या (Money Laundering Case) प्रकरणात ते तुरूंगात आहेत. शेलारांनी या प्रकरणाचा धागा पकडत शिवसेनेवर टीका केली.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Ashish Shelar | narayan rane i dont dare take action on dawoods building but by putting binoculars on ranes bungalow ashish shelar on shiv sena

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा