Ashish Shelar | शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नाव बदलून ‘रडकी सेना’ ठेवायला पाहिजे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे -Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) यांनी पक्षाचे नाव बदलून आता ‘रडकी सेना’ ठेवायला पाहिजे, असा सल्ला भाजपचे मुंबई अध्यक्ष (BJP Mumbai President) आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. सत्तेत असताना ते केंद्र सरकारच्या (Central Government) नावाने रडत होते. आता विरोधी पक्षात असताना कधी न्यायालयाचे नावाने, तर कधी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Central Election Commission) नावाने रडतात. उद्या अंधेरी पोटनिवडणुकीत पराभव झाला, तर अंधेरीतील जनतेच्या नावाने रडारड सुरु करतील, असे देखील आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) मुरजी पटेल (Murji Patil) हे गेले असता,
त्यांच्यासोबत लोकांचा महापूर आला होता. आमच्यासमोर 10 पक्षांना सोबत घेऊन 10 तोंडांचा रावण उभा आहे.
ते बाहेरचे लोक बोलवत आहेत.
अनिल परब (Anil Parab) हे उपरे बाहेरचे लोक आणि त्यांच्याविरोधात स्थानिक मुरजी पटेल (Murji Patel)
असा हा सामना होणार आहे. त्यामुळे या लढतीत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपाई गटाच्या उमेदवाराचा 25 – 30 हजार मताधिक्यांनी विजय होणार असल्याचा विश्वास आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दर्शविला.

अंधेरीत मुरजी पटेल यांना काका म्हणून ओळखतात. प्रत्येक नागरिक त्यांना ओळखतो.
ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरोधात बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena)अशी आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सहानुभूतीच्या जोरावर ही निवडणूक लढविली जात आहे.
ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा उशीरा देऊन त्यांना उमेदवारी न देण्याचा ठाकरे गटाचा डाव होता,
असा आरोप दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे.

दरम्यान, अंधेरीतील निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
ही लढत केवळ लटके आणि पटेल यांच्यातील नसून महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध शिंदे गट आणि भाजपची झाली आहे. दोनही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

Web Title :- Ashish Shelar | shivsena uddhav balasaheb thackeray should change the name of the party to radki sena bjp ashish shelar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | उदय सामंत यांचा थेट इशारा, म्हणाले – ‘ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल, तेव्हा आम्ही…’

Jayant Patil | पोलीस दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, जयंत पाटील यांचा आरोप

Nitesh Rane | आज जर का रमेश लटके हयात असते, तर ते…,  नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप