Ashok Chavan | ‘आता त्यांनी परत यायला हरकत नाही’, अशोक चव्हाणांनी शिंदे गटाला डिवचलं (व्हिडिओ)

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य मंत्रिमंडळात अर्थखातं अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाले आहे. यावर काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे. अजित पवार अर्थमंत्री (Finance Minister) असल्याने त्यांनी आम्हाला निधी दिला नाही, असं कारण देऊन जे लोक उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडून गेले, त्यांना आता परत यायला हरकत नाही, अशी मिश्किल टीका अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

वित्त विभाग दादांकडे असल्याने आमच्यावर अन्याय झाला, अशी सबब सांगून काही आमदार उद्धवजींना सोडून गेले. पण ज्या दादांमुळे ते सोडून गेले, तेच दादा आज पुन्हा राज्याचे अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे या मंडळींनी आता परत यायला हरकत नाही. त्यासाठी त्यांना हे कारण पुरेसं आहे. पण त्यांना घ्यायचं की नाही, हा शिवसेनेचा प्रश्न आहे. त्यावर मी काही सांगणार नाही, असंही अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.

प्रत्येकाची कमिटमेंट असायला हवी

क्षेत्र कोणतेही असो काम करताना प्रत्येकाची कमिटमेंट असायला हवी. जे सांगतात की आम्ही समाजसेवेसाठी इकडून तिकडे गेलो, तिकडून इकडे आलो ही सगळी बंडलबाजी आहे. देशात आणि राज्यात केवळ सोयीचं राजकारण (Maharashtra Political News) चाललं आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना आपला हेतू काय? आपली कमिटमेंट काय? समाजाप्रती आपण काय देणं लागतो? आपण जे करतो आहोत ते योग्य आहे की अयोग्य आहे? यांचे आत्मपरीक्षण करावं. आज जे काही चाललंय ते सगळं कमिटमेंट सोडूनच चालले आहे, असेही चव्हाण म्हणाले.

पक्षांतरबंदी कायद्याची पायमल्ली झाली

सध्याच्या राजकारणावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. ‘आयपीएल’प्रमाणे ऑक्शन (IPL Auction) सुरू आहे. या ऑक्शनमध्ये सगळ्या गोष्टी बाजूला सारून इकडून तिकडे, तिकडून तिकडे सुरू आहे. दुर्दैवाने पक्षांतर बंदी कायद्याची (Defection Act) पायमल्ली होऊन गेली. कोणी बघायला तयार नाही. कोर्टात फक्त तारिख पे तारिख सुरू आहे. राजकारणाची दिशा भरकटली आहे. माणूस भेटल्यावर विचार करावा लागतो हा नेमका कोणत्या पक्षात आहे? आणि पक्षात सुद्धा कोणत्या गटात आहे?

देशात आणि राज्यात राजकीय प्रदूषण प्रचंड वाढलंय

देशात आणि राज्यात राजकीय प्रदूषण प्रचंड वाढलंय. महाराष्ट्रासारख्या राज्यावरही तेच अनुभवण्याची वेळ यावी, हे मोठे दुर्दैव आहे. राज्याची राजकीय परिस्थिती मी फार जवळून बघितली. वसंतराव नाईक (Vasantrao Naik), शंकरराव चव्हाण (Shankarao Chavan), वसंतदादा पाटील (Vasantdada Patil), ए.आर. अंतुले (A.R. Antule), बाबासाहेब भोसले (Babasaheb Bhosale), शरद पवार (Sharad Pawar), विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) अशा मान्यवरांची कारकिर्द, त्यांची भूमिका, काम करण्याची पद्धत, महाराष्ट्राचा झालेला विकास हे सारं मी जवळून पाहिलं. त्यामुळे तो कालावधी आणि आजची परिस्थिती पाहिल्यानंतर नेमकं काय चाललं ते लक्षात येत नाही. स्तर सोडून जे सुरू आहे ते खरंच लोकांना आवडतंय का? जे काही चाललंय ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही आणि आवडणार नाही, अशी माझी ठाम भूमिका असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Web Title : Ashok Chavan | congress leader ashok chavan targets shivsena after ajit pawar got finance ministry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bachchu Kadu | ‘अजित पवारांच्या सोयीनुसार खातेवाटप’, खातेवाटपावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Pune Cyber Crime News | पुण्याच्या येरवड्यातील इझी पे प्रा.लि. कंपनीची 3.5 कोटींची फसवणूक करणार्‍या नोंदणीकृत एजंटास सायबर पोलिसांकडून अटक

ACB Trap News | वृद्ध शेतकऱ्याकडून 2 लाखाची लाच घेताना दैनिकाच्या संपादकासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून मुंढव्यातील ICICI बँकेचे एटीएम फोडुन चोरी करणार्‍यांना 24 तासात अटक