Asia Cup : BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने केली मोठी घोषणा, ‘इथं’ होणार ‘भारत-पाकमध्ये ‘सामना’

कोलकाता : वृत्त संस्था – यावेळेस आशिया कपचे यजमानपद दुबईकडे आहे. भारत-पाकिस्तानच्या टीम यामध्ये भाग घेणार आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने शुक्रवारी ही माहिती दिली. दुबईत 3 मार्चला आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) ची बैठक होणार आहे.

गांगुलीने दुबईहून रवाना होण्यापूर्वी येथे ईडन गार्डन्सच्या स्टेडियममध्ये म्हटले की, आशिया कप दुबईत खेळला जाणार आहे, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान, दोन्ही देश सहभागी होणार आहेत.

यावेळेला आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानला हवे होते, परंतु भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता.

भारतीय टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने महिला टी-20 विश्व कपच्या सेमीफायनलमध्ये पोहचणार्‍या भारतीय टीमला शुभेच्छा दिल्या. त्याने म्हटले की, ते खुप चांगले खेळत आहेत आणि याच बळावर त्यांनी क्वालिफाय केले आहे. कोणतीही टीम या टूर्नामेन्टमध्ये फेव्हरेट नाही. भारतीय टीम चांगली आहे, पाहुयात काय होते.