भारतीय महिला हॉकी संघाची धडाकेबाज कामगिरी 

जकार्ता :
भारतीय  महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी केली. भारताच्या  महिला संघाने हॉकीच्या मैदानावर कझाकस्तानचा २१-० अशा फरकाने धुव्वा उडवला. हिंदुस्थानी संघातील चार खेळाडूंनी गोलची हॅटट्रिकही केली. तसेच या स्पर्धेतील हा भारताचा सलग दुसरा विजय ठरला याआधीच्या लढतीत हिंदुस्थानने इंडोनेशिवर मात केली होती .

सामन्याच्या प्रारंभापासूनच भारतीय खेळाडूंनी खेळावर संपूर्ण नियंत्रण मिळविले. भारतीय खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट सांघिक व आक्रमक खेळापुढे कझाकिस्तानचा बचाव साफ कोलमडला होता.

भारतीय संघाने सुरुवातीपासूनच कझाकिस्तानवर जोरदार आक्रमण केले. त्यामुळे पहिल्या सत्रापासून भारताने आघाडी घ्यायला सुरुवात केली. गुरजितने भारतासाठी चार, तर वंदना कटारिया लालरेमसियामी आणि नवनीत कौर यांनी प्रत्येकी तीन गोल केले. नवज्योत कौर आणि लिलिमा यांनी प्रत्येकी दोन गोल संघाच्या विजयात आपला वाटा उचलला, त्याचबरोबर उदिता, नेहा गोयल, मोनिका आणि दीपग्रेस यांनी प्रत्येकी एक गोल केला.
[amazon_link asins=’B01NAUKS62,B01FJHV48A’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c6350e34-a5f0-11e8-961c-f5a3827e04d1′]

.