पैलवान सुशील कुमारला पराभवाचा धक्का

जाकार्ता :

कुस्तीमध्ये भारताचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार याचा पात्रता फेरीत पराभव झाला. डबल ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार पात्रता फेरीचा अडथळाही दूर करू शकला नाही. बहारिनच्या आदमविरुद्ध सुरवातीला मिळविलेल्या आघाडीचा त्याला फायदा घेता आला नाही. त्यामुळेच त्याला ५-३ असा परभव पत्करावा लागला.

दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सुशील कुमारकडून या वेळी सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र, त्याला या अपेक्षांची पूर्तता करता आली नाही. सुशीलने २००६च्या दोहा आशियाई स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले होते, तर मागील दोन आशियाई स्पर्धेतून त्याने माघार घेतली होती. खरे तर सुरुवातीला सुशीलकडे २-१ अशी आघाडी होती. मात्र, त्याला नंतर ही आघाडी वाढविता आली नाही. सुशीललाही या पराभवाचे आश्चर्य वाटले. सुशीला रिपेचेजमध्ये खेळण्याची संधी होती. मात्र, अॅडमला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागल्याने सुशीलच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या.
[amazon_link asins=’B078LVWLJX,B0794W14FY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7187076-a472-11e8-951b-a3fcb0f9be5d’]
या पराभवामुळे सुशीलकुमारच्या कारकिर्दीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत असले, तरीही दिर्घ कारकिर्द बाकी असून, लवकरच जोरदार पुनरागमन करणार असल्याचा विश्वास सुशील कुमारने व्यक्त केला आहे. या सामन्यामध्ये सुशील कुमार आक्रमक नव्हता, तरीही त्याने त्याच्या बचावात्मक पवित्र्याचे समर्थन केले. ‘या आधीही मला पराभव पत्करावे लागले आहेत, त्याप्रमाणेच या वेळीही मी जोरदार पुनरागमन करीन. मी थकलेलो नाही, तर आजही मी खेळाचा आनंद घेत आहे,’ अशी प्रतिक्रिया सुशील कुमारने सामन्यानंतर दिली.