Asim Sarode On Eknath Shinde | शिंदेंकडे गेलेले 12 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाणार; असीम सरोदे यांचा चंद्रपूर मध्ये दावा

नागपूर: Asim Sarode On Eknath Shinde | प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी ज्याला ठाणे जिल्ह्याबाहेर ओळख नाही असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. तसेच शिंदेंकडे गेलेले १२ आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगून त्या आमदारांच्या नावांची यादीच वाचून दाखवली.(Asim Sarode On Eknath Shinde)

पालघरचे श्रीनिवास वनगा, चोपड्याच्या लता सोनवणे, अलिबागचे महेंद्र दळवी, मागाठणेचे प्रकाश सुर्वे, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर, एरंडोलचे चिमणराव पाटील, बाळापूरचे नितीनकुमार तळे, औरंगाबाद मध्यचे प्रदीप जैस्वाल, कन्नडचे उदयसिंह राजपूत, कोरेगावचे महेश शिंदे, राधानगरीचे प्रकाश आबिटकर ही नावे सरोदे यांनी सांगितली. मात्र यातील २ आमदार उद्धव ठाकरेंसोबत असून त्यातील एका आमदाराचे नाव सरोदेंनी वेगळेच घेतले.

चंद्रपूरच्या निर्भय बनतो सभेत सरोदे यांनी दावा केला की हे १२ आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे शरण येण्यास तयार आहेत.
कारण त्यांच्या लक्षात आले आहे की आपले ‘या’ माणसासोबत भवितव्य नाही.

निर्भय बनो या माध्यमातून असीम सरोदे यांच्यासह इतर मंडळींनी चंद्रपूरात सभा घेतली.
त्या सभेत सरोदेंनी केलेल्या झाल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sahakar Nagar Crime | महागड्या सायकल चोरणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांकडून अटक, 6 सायकल जप्त

Punit Balan Group (PBG) | इंद्राणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत दोघांची एक कोटींची फसवणूक