Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत दोघांची एक कोटींची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत अनेकांची फसवणूक केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दोघांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून 1 कोटी 11 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pimpri Chinchwad Crime)

वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) मनोज आतंमप्रकाश भाटीया (वय-46 रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरुन एक महिला व आदित्य पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते 13 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेअर मार्केट ट्रेडिंगच्या शोधात होते. त्यावेळी पॅनथीऑन व्हॅनचेर्स या इन्स्टाग्राम पेज वरुन व्हॉट्सअॅपच्या पॅनथीऑन ग्रुपला जॉईन करुन घेतले.या गुपचा चालक आदित्य पाटील व सहायक महिला यांनी अॅडक्टीव्ह लर्निंग टेक्नॉलॉजी लि. या कंपनीच्या आयपीओ ची माहिती दिली. फिर्यादी यांनी 75 लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला सात हजार रुपयांचा नफा फिर्यादी यांना देऊन विश्वास संपादन केला. मात्र त्यानंतर कोणताही परतावा अथवा गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता 75 लाखांची फसवणूक केली.

फसवणुकीची दुसरी घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत पंकज प्रभाकर तेरकर (वय-39 रा. माण)
यांनी फिर्य़ाद दिली आहे. यावरुन एका महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी महिलेने फिर्यादी पंकज ट्रेडिंग बाबत मार्गदर्शन करण्याचा बहाणा करून रजिस्ट्रेशन करण्यास भाग पाडले.
त्यानंतर प्रथम 30 हजार रुपये गुंतवण्यास सांगितले. पंकज यांनी एका युपीआय आयडीवर पैसे पाठवले असता त्यांना
20 हजार रुपये फायदा झाल्याचे सांगितले. दरम्यान त्यांना 54 लाख 39 हजार रुपये गुंतवण्यास सांगितले.
पैसे नसल्याने पंकज यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, महिलेने त्यांना भीती घालून गुंतवणूक करण्यास
भाग पाडले. पंकज यांनी वेळोवेळी एकूण 36 लाख 67 हजार रुपये गुंतवले. यानंतर कोणताही परतावा न देता तसेच
गुंतवलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gyanesh Kumar- IAS Sukhbir Singh Sandhu | ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंह संधू नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त, पंतप्रधान समितीकडून निवड

Pune Police MCOCA Action | वारजे माळवाडी परिसरातील गणेश उर्फ गुड्या पटेकर टोळीवर ‘मोक्का’! चालु वर्षातील पुणे पोलिसांची 16 वी कारवाई

Jayant Patil On Modi Ki Guarantee | ‘मोदी की गॅरंटी’वर जयंत पाटील यांची बोचरी टीका, ”चले तो चांद तक, नही तो शाम तक”

Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती स्थिर, उद्या घरी सोडणार