Pune Sahakar Nagar Crime | महागड्या सायकल चोरणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांकडून अटक, 6 सायकल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sahakar Nagar Crime | पुणे शहरातील वेगवेगळ्या परिसरात महागड्या सायकल चोरणाऱ्या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून सहा सायकल जप्त केल्या आहेत (Arrest In Vehicle Thefts). ही कारवाई जवाहर बेकरी, धनकवडी येथे केली. अंकुश भाऊसाहेब गोंडगीरे (वय-21 रा. शिवाजीनगर एसटी स्टँड मागे, शिवाजीनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Pune Sahakar Nagar Crime)

सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलींग करत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना माहिती मिळाली की, जवाहर बेकरी धनकवडी येथे एक तरुण सायकलवर संशयास्पद फिरत आहे. तपास पथकाने त्याठिकाणी जाऊन त्याला हटकताच तो सायकलसह पळून लागला. पोलिसांनी काही अंतरावर त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या सायकल बाबत विचारणा केली असता त्याने सायकल चोरी केल्याचे सांगितले. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास केला असता जानेवारी 2024 पासून त्याने के.के. मार्केट, स्मशानभुमी रोड तीन हत्ती चौक, बालाजी नगर या ठिकाणाहून पाच सायकली चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी आरोपीकडून सहा सायकल जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परीमंडळ 2
स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, सहायक पोलीस फौजदार बापु खुटवड
पोलीस अंमलदार किरण कांबळे, अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर सुतकर,
अमीत पद्माळे, संजय गायकवाड, निलेश शिवतरे, विशाल वाघ, भाऊसाहेब आहेर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gyanesh Kumar- IAS Sukhbir Singh Sandhu | ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंह संधू नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त, पंतप्रधान समितीकडून निवड

Pune Police MCOCA Action | वारजे माळवाडी परिसरातील गणेश उर्फ गुड्या पटेकर टोळीवर ‘मोक्का’! चालु वर्षातील पुणे पोलिसांची 16 वी कारवाई

Jayant Patil On Modi Ki Guarantee | ‘मोदी की गॅरंटी’वर जयंत पाटील यांची बोचरी टीका, ”चले तो चांद तक, नही तो शाम तक”

Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती स्थिर, उद्या घरी सोडणार