Aslam Sheikh | फडणवीसांच्या भेटीनंतर स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस, भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मढ मार्वेच्या एक हजार कोटींचा स्टुडिओ घोटाळ्या प्रकरणी (Madh Marve Studio Scam Case) अस्लम शेख (Aslam Sheikh) यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पर्य़ावरण मंत्रालयाने (Ministry of Environment) ही नोटीस (Notice) बजावली आहे. याप्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी (Mumbai Collector) आणि महानगरपालिकेला (Municipal Corporation) कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे आता अस्लम शेख (Aslam Sheikh) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

काँग्रेसचे माजी मंत्री (Former Congress Minister) अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी 4 ते 5 दिवसांपूर्वीर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास्थानी जाऊन शेख त्यांना भेटले होते. अत्यंत गुप्त पद्धतीने ही भेट झाली होती आणि या भेटीचं नेमंक कोणतंही कारण स्पष्ट झालं नव्हतं. या भेटीनंतर ते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीतून निघून गेले होते. त्यामुळे अस्लम शेख हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

या भेटीपूर्वीच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अस्लम शेख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
अनिल परबांनी (Anil Parab) दापोलीत समुद्रात जसं रिसॉर्ट बांधले तसेच मढमध्ये कोरोना काळात माजी मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने मोठमोठी बांधकामे उभी राहिली आहेत.
समुद्रात सर्व नियमांचे उल्लंघन करुन अशी बांधकामे केली जात आहेत.
जवळपास दोनशे कोटींचा घोटाळा या ठिकाणी आहे. थेट समुद्रात स्टुडिओ आणि इतर बांधकामे केली जात आहेत,
असा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे अस्लम शेख यांच्यामागे ईडीचा (ED) ससेमिरा लागणार का?
अशा चर्चा होत्या. अशातच त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सोमय्या म्हणाले, की मला हा स्टुडिओ पाडण्याची अपेक्षा आहे.

 

Web Title :- Aslam Sheikh | environment ministry issued notice to aslam sheikh in madh marve rs 1000 crore studio scam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Black Jamun | हिमोग्लोबिनच्या कमतरतेपासून ब्लड प्रेशरपर्यंत इफेक्टिव्ह आहे जांभूळ, जाणून घ्या अनेक फायदे

 

Muesli Health Benefits | मूसळी वजन कमी करण्यासाठी उपयोगी, अनेक आजारांत देते आराम

 

Soya For Male Fertility | सोया खाल्ल्याने पुरुषांच्या फर्टिलिटीवर परिणाम होतो का? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचा सल्ला