सेक्सला नकार दिल्याने ‘त्या’ मॉडेलची हत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दोन दिवसांपूर्वी मालाड येथे झालेल्या एका मॉडेल मानसी दिक्षितच्या खून प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे. मानसीने आरोपी सय्यदसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. सय्यदने बांगुर नगर पोलीसांना दिलेल्या जबानीत हे समोर आले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb2349d1-d2ac-11e8-ae55-59584d38a5d7′]

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मानसी काही दिवसांपूर्वी तिच्या राजस्थान येथील घरी गेली होती. रविवारी ती मुंबईत परतली. सय्यद देखील त्यावेळी त्याच्या गावी हैदराबादला गेला होता. सोमवारी त्या दोघांनीही भेटण्याचे ठरवले. त्यासाठी मानसी सय्यदच्या अंधेरी मित्तल नगर येथील घरी गेली होती. त्यावेळी सय्यदच्या घरी कुणीही नव्हते. तिच संधी साधून सय्यदने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र मानसीने त्याला नकार दिल्याने सय्यद चिडला व त्याने तेथील एका जड वस्तूने तिच्या डोक्यावर वार केला.

त्यानंतर मानसी बेशुद्ध झाली पण तरी ती जिवंत होती. मात्र त्यानंतर सय्यदने रश्शीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घरातील एका मोठ्या सुटकेसमध्ये मानसीचा मृतदेह भरला व तो कॅब करून मालाडला घेऊन आला.

[amazon_link asins=’B01LVXMWNU,B06XN6BY5V’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9c55b355-d2ac-11e8-8e48-5d4ece48f634′]

सेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू……

पनामा : सेल्फीचा नाद जीवावर बेतू शकतो हे माहित असूनही लोकांची सेल्फीची क्रेझ कमी होताना दिसत नाही. याच सेल्फीच्या नादात एका महिलेचा 27 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना पनामा येथे घडली आहे. सॅंड्रा मॅन्युएल डा कोस्टा मेसीडो (27) असे तिचे नाव आहे. सॅंड्रा दोन मुलांची आई असून ती मूळची पोर्तुगालची रहीवासी आहे. ती पनामाला फिरण्यासाठी आली होती. येथील सर्वात गगनचुंबी इमारत असलेल्या ईकाई या आलिशान इमारतीच्या (27) व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ती राहत होती. फ्लॅटच्या खिडकीत उभे राहून ती फोटो काढत होती. त्याचवेळी अचानक तिचा तोल जाऊन ती कोसळली. ही घटना जेव्हा घडत होती त्यावेळी काहीजणांनी घटनेचा व्हिडीओ काढला व सोशल साईटवर पोस्टही केला. त्यानंतर सॅँड्राच्या एका मित्राने हा व्हिडीओ बघितल्यानंतर तिची ओळख पटली. दरम्यान, उंचावर वेगाने हवा येत असल्याने सँड्राचा तोल जाऊन ती पडली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.