Assembly Elections 2021 : बंगाल आणि आसाममध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू, नंदीग्राममध्ये मतदारांची मोठी रांग

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरू वात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानासाठी नंदीग्राममध्ये मतदान केंद्र क्रमांक 110 च्या बाहेर मतदारांची मोठी रांग लागली होती.

सिलचरमध्ये ईव्हीएम खराब झाल्याने कन्या विद्यालयात मतदान केंद्र क्रमांक 146 वर तात्पुरती मतदान प्रक्रिया रोखण्यात आली आहे. तसेच आसाममध्ये ईव्हीएम बिघडल्याने नगांवच्या नोवग लॉ कॉलेजमध्ये मतदान केंद्र क्रमांक 26 वर मतदानाला उशीर झाला आहे.