Assembly Elections 2022 | आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची मोठी तयारी; फडणवीसांवर सोपवली नवी जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Assembly Elections 2022 | भाजपने (BJP) मागील काही वर्षापासुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर राज्यातील जबाबदारी सोपवली आहे. राज्यातील भाजप (BJP) पक्षाचे नेतृत्व हे फडणवीस पाहत असतात. मागील विधानसभा रणधुमाळीत भाजपने मुख्यमंत्र्याचे सुत्र त्यांच्याकडेच दिले होती. यंदाच्या (2019) विधानसभा निवडणुकीत देखील मुख्यमंत्र्याचे दावेदार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच होते. मागील काही दिवसापासुन त्यांना केंद्रात वेगळी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्ची होती. यांनतर फडणवीस यांच्याकडे आता भाजपाने एक नवी जबाबदारी सोपवली आहे. (Assembly elections in five states in 2022)

आगामी २०२२ मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपाने नव्या प्रभारींची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांची गोव्याचे (Goa) प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी 2022 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची निवडणूक रणनीती आणि इतर सर्व निर्णय प्रक्रिया फडणवीसांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.

बिहार निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीस यांना पक्षाने जबाबदारी दिली होती. त्या बिहार निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं होतं. दरम्यान, आगामी 2022 मध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजप पक्षाने आता कंबर कसली आहे. मार्च-एप्रिल-मे या 3 ते 4 महिन्यात या निवडणुका होतील. त्यासाठी भाजपाने पदाधिकारी आणि जबाबदारी वाटपामध्ये फेरबदल केलेत

 

या दरम्यान, उत्तराखंडची (Uttarakhand) जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Union Minister Pralhad Joshi) यांच्याकडे सोपवली आहे. पंजाबची (Punjab) जबाबदारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Union Minister Gajendra Singh Shekhawat) यांच्याकडे दिली आहे. मणिपूरसाठी (Manipur) केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Union Minister Bhupendra Yadav) यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Minister Dharmendra Pradhan) यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

2022 मध्ये ‘या’ 5 राज्यांत निवडणुका…

– उत्तर प्रदेश (सध्या भाजप सरकार)

– पंजाब (सध्या काँग्रेस सरकार)

– उत्तराखंड (सध्या भाजप सरकार)

– गोवा (सध्या भाजप सरकार)

– मणिपूर (सध्या भाजप सरकार)

 

Web Title : Assembly Elections 2022 | bjp appointed devendra fadnavis as goa prabhari for upcoming assembly elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Metro | …तोपर्यंत लकडी पुलावरील मेट्रोचे काम थांबविण्याचा महापौर मुरलीधर मोहोळ यांचा आदेश

Supreme Court | केंद्राचे ऐतिहासिक पाऊल ! सुप्रीम कोर्टाला सांगितले – महिलांना सुद्धा मिळेल NDA मध्ये प्रवेश, पण गाईडलाईनसाठी वेळ द्या

Pune District Court | पुणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज 2 शिफ्टमध्ये