आगामी विधानसभा निवडणूक ‘EVM’वरच : मुख्य निवडणूक अधिकारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीन संदर्भात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, येणारी निवडणूक ही ईव्हीएम मशीनवरच घेतली जाणार आहे. बॅलेट पेपर आता आपल्या देशात इतिहास जमा होत आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये जे-जे नवीन बदल आहेत ते स्वीकारून चांगल्या पद्धतीने निवडणूका पार पडतील असा प्रयत्न आमचा असेल, असे देशाचे मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी सांगितले.

शासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण
देशात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची शासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. प्रशासनातील पोलीस, जिल्हाधिकारी, केंद्रीय संस्था यांच्याबाबत बैठक झाल्या आहेत. निवडणूक कालावधीमध्ये सुरक्षा यंत्रणा म्हणून तेलंगणा, आंध्र, तामिळनाडू या राज्यातील पोलीस यंत्रणा मागवण्यात येणार आहे. तसेच महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचे आरोरा यांनी सांगितले. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खर्चाची मर्यादा तेवढीच
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा तितकीच राहणार आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यात ज्या ठिकाणी मतदान होणार आहे ते सर्व पोलिंग सेंटर यापूर्वी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर असायची. वरिष्ठ मतदारांनी याबाबत तक्रार केल्यामुळे यापुढे पोलिंग सेंटर तळमजल्यावर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Visit – policenama.com 

You might also like