अस्थमाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यायला हवी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अस्थमा जडलेल्या लोकांना धुळीचा खूप त्रास होतो. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यायला हवी. बाहेर पडताना अँटी डस्ट मास्क घालणं गरजेचं आहे. घरातही धुळीचं साम्राज्य असतं. त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. घरात वायू शुद्धीकरण उपकरण बसवा. धुरामुळेही श्वसनाचे त्रास वाढतात. म्हणूनच अस्थमा रुग्णांनी धुरापासूनही लांब राहायला हवं. स्वयंपाकघरातही धूर होतो. त्यामुळे जेवण बनत असताना स्वयंपाक घरात जाऊ नये. धूम्रपानामुळेही अस्थमाची समस्या वाढते. त्यामुळे अस्थमा रुग्णांनी धूम्रपान करू नये. तसंच धूम्रपान होत असलेल्या ठिकाणी जाऊ नये.

पाळीव प्राण्यांच्या केसांमुळेही अस्थमाच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी कुत्रे, मांजरांपासून लांब रहावं. हे प्राणी पाळण्याचा विचार करू नये. या प्राण्यांचे केस उडत असतात. त्यातच त्यामध्ये साठलेली धूळ त्रासदायक ठरते. म्हणूनच प्राणी जवळ असतील तर अस्थमा रुग्णांनी काळजी घ्यावी. ओलसर वातावरणाचा अस्थमा रुग्णांचा त्रास होऊ शकतो. अशा वातावरणात धुलीकण कार्यरत असतात. तसंच आर्द्रता वाढल्याने त्रास होऊ शकतो. घरात अस्थमाचा रुग्ण असेल तर डिह्युमिडिफायर बसवून घ्या. यामुळे घरातली आर्द्रतेची पातळी नियंत्रणात राहू शकेल. त्यातही पावसाळ्यात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

सगळीकडेच वाहनांचं प्रमाण वाढत आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे वायू प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढते आहे. दिल्लीसारख्या शहरांमध्ये तर हवेचा दर्जा खूपच खालावला आहे. अशा परिस्थितीत अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढू शकते. श्वसनाचे विकार नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला हवी. वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असताना फुफ्फुस आणि श्वसनाशी संबंधित विकारही वाढत आहेत. वायू प्रदूषणाशी संबंधित विकारांमध्ये अस्थमाचं प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल. त्यातही शहरांमध्ये राहणाऱ्यांना अस्थमा होण्याची शक्यता अधिक असते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/