त्यावेळी तत्कालीन सरकारने का आणली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी  

वृत्तसंस्था : पोलीसनामा ऑनलाईन – सगळेच पक्ष जातीयवादी आणि धर्मवादी आहेत असं सर्व सामान्यांचं नेहमीच म्हणणं असत. त्यात सत्तारूढ पक्ष ज्यांची ध्येय धोरणे अवलंबतो ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हि संघटना जी कि वेळोवेळी आपला प्रखर हिंदुत्ववाद समोर आणत असते. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संघटना आहे. संघाने नेहमी प्रत्येकाच्या श्रद्धेचा मान ठेवलेला आहे. यावेळी संघाचा एकेकाळचा खडतर प्रवास सांगताना ते म्हणाले संघासमोर सर्वांत मोठे आव्हान हे महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झाले होते. त्यावेळी ४ फेब्रुवारी १९४८ ला संघावर सरकारने बंदी घातली होती.

रामटेक येथील कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात आरएसएसचे दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरूजींच्या नावावर शैक्षणिक संकुल आणि गुरूकुलमचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी विद्यासागर राव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गुरूजी नावाने प्रख्यात असलेले एम एस गोळवलकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक होते.

– संघा समोरचे आवाहन

ते म्हणाले, संघाच्या रूपाने डॉ. के बी हेडगेवार यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. याच्या शाखा जगभरात आहेत. संघाचा प्रवास शानदार आणि कठीण असा राहिला आहे.

-संघाची कामगिरी

त्याचबरोबर संस्कृतला जागतिक स्तरावर मान्यता मिळत असून जर्मन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी प्रमुख विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषेचा अभ्यास केला जात आहे. संस्कृत ला जागतिक करण्यासाठी संघाने मोठी कामगिरी केली आहेच , अजूनही आपल्या विद्यापीठाने जगातील विद्यापीठांसोबत समन्वय साधून संस्कृत अध्ययनासोबत संशोधनाला प्रोत्साहन देत एक प्रमुख अध्ययन केंद्र म्हणून विकसित करावे, असे राज्यपाल म्हणाले.

-संघ धर्म निरपेक्ष

संघाचे विरोधक म्हणतात अगदी त्याच्या उलट आरएसएस सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संघटनांपैकी एक आहे. संघाने प्रत्येक व्यक्तीचे आणि धर्माचे पालन करण्याच्या अधिकाराचा सन्मान केला असल्याचे राव यांनी म्हटले.